Showing posts with label write for us. Show all posts
Showing posts with label write for us. Show all posts
प्रेम
Posted on Wednesday, August 24, 2011
त्यांची वेडी मैत्री
ती, अगदी नाकासमोर चालणारी. मुलांबददल मनात एक अनामिक भीती बाळगून असलेली. कुणा मुलाशी बोलायलाही न धजवणारी. एखाद्या मुलाशी आपली घट्ट मैत्री होऊ शकेल असा विचारही तिने कधी केलेला नाही. तर त्याची स्थिती मात्र त्याहून जरा वेगळी. नवख्यांसाठी काहीसा अबोल, तर त्याला ओळखणार्यांच्या दृष्टीने चालते-फिरते रेडिओ स्टेशन. थोडासा मुडी म्हणा हवं तर. स्वारी रंगात असली की भरभरून बोलणार, नाहीतर घुम्म. अनेक मित्र-मैत्रिणी असलेला. मात्र तरीही एकटाच. कसल्या तरी शोधात. कदाचित मित्र-मैत्रिणींच्या गराड्यातही एखाद्या हक्काच्या अगदी जवळच्या मित्राच्या शोधात.
Posted on Saturday, August 06, 2011
सर्वांत श्रीमंत विद्यार्थी!
शाळेने पत्रक काढलं,' यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल!
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार,एक सदरा असेल, तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलगा शोधायचा कसा? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती. तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,"मला एक मदत कराल का?आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार,एक सदरा असेल, तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलगा शोधायचा कसा? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती. तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,"मला एक मदत कराल का?आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता
Posted on Thursday, August 04, 2011
बरसात की रात!
जिंदगीभर नही भूलेगी वो...
आम्ही दोघेच
अंधाराच्या गाभाऱ्यात
भुरुभुरु पावसाची हलकीशी सर
ओलावलेल्या पानांची मंद सळसळ...
गारव्याची झोंबाझोंबी...
आनंदाची शिरशिरी
कोण बोलले, काय बोलले
याची तमा कोणाला
हळुवार आठवणींचे मोरपिस मनाला गोंजारून गेले
ती रात्र, ती जागा, ती ती
मनात कायमची घर करून गेली
आठवणीचे मनोरे चढत गेले
Posted on Friday, July 02, 2010
ऒढ मिलनाची
ऒढ सागराची बांधही फोडीत गेली
मार्गातील सगळ्यांना आकंठ बुडवीत गेली ||१||
ती आस मुरारीची व्याकूळ बनवून गेली
अवखळ राधेतील वात्सल्य जागवून गेली ||२||
तृषार्थ चातकाची तृष्णा शमवून गेली
ती धार मृगाची तृप्त करून गेली ||३||
मिलनास पृथ्वीराजाच्या भारावून गेली
ती संयुक्ता अल्लड भांबावून गेली ||४||
मार्गातील सगळ्यांना आकंठ बुडवीत गेली ||१||
ती आस मुरारीची व्याकूळ बनवून गेली
अवखळ राधेतील वात्सल्य जागवून गेली ||२||
तृषार्थ चातकाची तृष्णा शमवून गेली
ती धार मृगाची तृप्त करून गेली ||३||
मिलनास पृथ्वीराजाच्या भारावून गेली
ती संयुक्ता अल्लड भांबावून गेली ||४||
Posted on Friday, June 04, 2010
वेदनेची संवेदना-२ (विस्तीर्ण)
सामर्थ्य वेदनेचे धडकी भरवाया लागले
अन् सारे वेदनेला शरण जावया लागले (१२)
साम्राज्य वेदनेचे चौदिशा वाढाया लागले
लोक वेदनेचे मांडलिक व्हाया लागले (१३)
(मी) वेदनेच्या मोहात फसण्या लागलो
मजला वेदनेचे लावण्य भुलवू लागले (१४)
मातेसम वेदना मज पाजू लागली
वात्सल्यरूपी वेदनेचे रूप पाहू लागलो (१५)
वेदना सूर्यासम मज झोकाळू लागली
तिमिराकडून तेजाकडे नेऊ लागली (१६)
वेदना सागरासम मज खोली देऊ लागली
शिंपल्यातील अमूल्य मोती बनवू लागली (१७)
वेदना छिन्नीसम मजला तराशू लागली
सुंदर-सुबक शिल्प साकारू लागली (१८)
वेदना मज काव्यत्म आयाम देऊ लागली
अत्तुच्च प्रतिभेचा साक्षात्कार घडवू लागली (१९)
आकाशासम वेदना मज विस्तारू लागली
अन् सामावण्याच्या कक्षा रुंदावू लागली (२०)
अनंतरुपी वेदनेचे दर्शन घडण्या लागले
प्रती क्षणं वेदनेचा कुंदन बनवाया लागला (२१)
वेदना गुरुसम मज घडवाया लागली
प्रतिदिन गुरु दक्षिणा मागाया लागली (२२)
मीही अर्जुनासम वेध घ्याया लागलो
एकलव्यासम अंगठा द्याया लागलो (२३)
अन् सारे वेदनेला शरण जावया लागले (१२)
साम्राज्य वेदनेचे चौदिशा वाढाया लागले
लोक वेदनेचे मांडलिक व्हाया लागले (१३)
(मी) वेदनेच्या मोहात फसण्या लागलो
मजला वेदनेचे लावण्य भुलवू लागले (१४)
मातेसम वेदना मज पाजू लागली
वात्सल्यरूपी वेदनेचे रूप पाहू लागलो (१५)
वेदना सूर्यासम मज झोकाळू लागली
तिमिराकडून तेजाकडे नेऊ लागली (१६)
वेदना सागरासम मज खोली देऊ लागली
शिंपल्यातील अमूल्य मोती बनवू लागली (१७)
वेदना छिन्नीसम मजला तराशू लागली
सुंदर-सुबक शिल्प साकारू लागली (१८)
वेदना मज काव्यत्म आयाम देऊ लागली
अत्तुच्च प्रतिभेचा साक्षात्कार घडवू लागली (१९)
आकाशासम वेदना मज विस्तारू लागली
अन् सामावण्याच्या कक्षा रुंदावू लागली (२०)
अनंतरुपी वेदनेचे दर्शन घडण्या लागले
प्रती क्षणं वेदनेचा कुंदन बनवाया लागला (२१)
वेदना गुरुसम मज घडवाया लागली
प्रतिदिन गुरु दक्षिणा मागाया लागली (२२)
मीही अर्जुनासम वेध घ्याया लागलो
एकलव्यासम अंगठा द्याया लागलो (२३)
Posted on Tuesday, June 01, 2010
वेदनेची संवेदना (गज़ल)
एवढे आले की मज दु:ख आवडाया लागले
अन् सुखाचे मग वावडे वाटाया लागले (१)
रोज मी वेदनेला कुरवाळाया लागलो
अन् तिच्यासाठी जखमाही उकराया लागलो (२)
वेदना शमताच पुन्हा जागवाया लागलो
वेदनेला रोमरोमात भिनवाया लागलो (३)
वेदनेची वासना जेव्हा वाढावया लागली
परमेश्वराकडे वेदनेची कामना कराया लागलो (४)
सुख अव्हेरून वेदना कवटाळाया लागलो
श्रृंगारासम वेदना भोगावया लागलो (५)
वेदनेच्या नसण्याने व्याकुळ व्हाया लागलो
प्रार्थनेत ही वेदनेची याचना कराया लागलो (६)
अन् सुखाचे मग वावडे वाटाया लागले (१)
रोज मी वेदनेला कुरवाळाया लागलो
अन् तिच्यासाठी जखमाही उकराया लागलो (२)
वेदना शमताच पुन्हा जागवाया लागलो
वेदनेला रोमरोमात भिनवाया लागलो (३)
वेदनेची वासना जेव्हा वाढावया लागली
परमेश्वराकडे वेदनेची कामना कराया लागलो (४)
सुख अव्हेरून वेदना कवटाळाया लागलो
श्रृंगारासम वेदना भोगावया लागलो (५)
वेदनेच्या नसण्याने व्याकुळ व्हाया लागलो
प्रार्थनेत ही वेदनेची याचना कराया लागलो (६)
Posted on Monday, May 24, 2010
लेखणीस चालवत गेलो (गज़ल)
लेखणीस माझ्या धार लावत गेलो
व्यवस्थेवर सपासप वार करत गेलो (१)
कलमास माझ्या नव्याने चालवत गेलो
ढोंगी राजकारण्यांना उघडे पाडत गेलो (२)
प्रस्थापितांना नवं आव्हान देत गेलो
विखारी सापांना पायदळी ठेचत गेलो (३)
नवविचारांचा आगाज करीत गेलो
धर्मांधांचे टराटरा बुरखे फाडत गेलो (४)
छाताडावर टीकांचे वार झेलत गेलो
शब्दांस माझ्या ढाल बनवितं गेलो (५)
झुंडशाहीला शब्दांनी नेहमी ठोकीत गेलो
(व्यक्ती) स्वातंत्र्यास जिवापाड जपत गेलो (६)
व्यवस्थेवर सपासप वार करत गेलो (१)
कलमास माझ्या नव्याने चालवत गेलो
ढोंगी राजकारण्यांना उघडे पाडत गेलो (२)
प्रस्थापितांना नवं आव्हान देत गेलो
विखारी सापांना पायदळी ठेचत गेलो (३)
नवविचारांचा आगाज करीत गेलो
धर्मांधांचे टराटरा बुरखे फाडत गेलो (४)
छाताडावर टीकांचे वार झेलत गेलो
शब्दांस माझ्या ढाल बनवितं गेलो (५)
झुंडशाहीला शब्दांनी नेहमी ठोकीत गेलो
(व्यक्ती) स्वातंत्र्यास जिवापाड जपत गेलो (६)
Posted on Saturday, May 22, 2010
अनेक होत्या (गज़ल)
आठवणींचा तुझ्या नव्हता कुठेच तोटा
हृदयास जाळणा-या ज्वाळा अनेक होत्या (१)
सांभाळू कसा ’मी’ समाधीस माझ्या
पडद्यावर नाचणा-या मेनका अनेक होत्या (२)
आयुष्य संपवावे वाटले परंतु
जगण्यास लावणा-या इच्छा अनेक होत्या (३)
बहकणा-या यौवनात साधाच राहिलो ’मी’
नादास लावणा-या वासना अनेक होत्या (४)
लपवू कसे लावण्यांस माझ्या, रस्त्यांवर
वखवखणा-या नजरा अनेक होत्या (५)
कसे कळेना श्वापदांनी साधला डाव
वस्तीत गस्तीच्या चौक्या अनेक होत्या (६)
हृदयास जाळणा-या ज्वाळा अनेक होत्या (१)
सांभाळू कसा ’मी’ समाधीस माझ्या
पडद्यावर नाचणा-या मेनका अनेक होत्या (२)
आयुष्य संपवावे वाटले परंतु
जगण्यास लावणा-या इच्छा अनेक होत्या (३)
बहकणा-या यौवनात साधाच राहिलो ’मी’
नादास लावणा-या वासना अनेक होत्या (४)
लपवू कसे लावण्यांस माझ्या, रस्त्यांवर
वखवखणा-या नजरा अनेक होत्या (५)
कसे कळेना श्वापदांनी साधला डाव
वस्तीत गस्तीच्या चौक्या अनेक होत्या (६)
Posted on Saturday, May 22, 2010
'मायभूमी'चे लेखक व्हा!
होय, माय मराठीच्या सेवेसाठी झटणा-या प्रत्येकाचे 'मायभूमी'वर स्वागत आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे लेखन करीत असल्यास आणि ते प्रकाशित व्हावं असं तुम्हाला वाटत असल्यास 'मायभूमी' तुम्हाला उपलब्ध करून देत आहे, एक मुक्तपीठ...
एक संधी- आपले विचार जगभरात पसरलेल्या कोट्यवधी मराठी बांधवांपर्यंत पोचवण्याची...
आपले यापूर्वी नेट जगतात प्रकाशित न झालेले स्वलिखित लिखाण आमच्याकडे पाठवा आणि आम्ही ते आमच्या असंख्य वाचकांपर्यंत पोचवू.
आपले यापूर्वी नेट जगतात प्रकाशित न झालेले स्वलिखित लिखाण आमच्याकडे पाठवा आणि आम्ही ते आमच्या असंख्य वाचकांपर्यंत पोचवू.
मग प्रतीक्षा कसली?
Posted on Tuesday, April 27, 2010
Subscribe to:
Posts (Atom)




