लोकमान्‍यांची लोकमान्‍यता

- विकास शिरपूरकर

ब्रिटीशांनी भारतावर 150 वर्षे राज्य केलं. इतकी वर्षे त्यांना आपल्याला गुलाम बनवून ठेवणे शक्य झालं कारण जातीपातीच्या धर्माधर्माच्या भिंतींमध्ये विभागला गेलेला भारतीय समाज. देशाला स्वातंत्र्य हवे असेल तर आधी या विखुरल्या गेलेल्या समाजाला एकत्र आणण्याची जातीजातीमधील तेढ कमी करण्याची आवश्यकता असल्याचे लोकमान्य टिळकांनी ओळखले.

गारवा आणि पाऊस कविता

गारवा




आता तुला सगळं जूनं...








 सरीवर सर... (संदीप खरे)



मृगाच्‍या सरींनो या हो... (पावसाची गाणी)



थेंबाचे मोती लेऊन




माझ्या संगे भिजावा पाऊस  (पावसाची गाणी)





चिंब मी चिंब तू (पावसाची गाणी)






सोनेरी उन्‍हात... हिरव्‍या रानात...







 निळा पाऊस भेटला (पावसाची गाणी)

स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.

बाजीप्रभुंच्‍या पराक्रमाचा साक्षीदार पन्‍हाळा

महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा सिंहाचा वाटा आहे. शिवरायांच्या शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचे कथन करणारा किल्ला म्हणून पन्हाळगडाकडे पाहिले जाते. किल्ल्याची उंची ही सुमारे ४०४० फूट आहे. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील किल्ल्याच्या तुलनेत अधिक उंचावर असल्याने देशभरासह विदेशातील पर्यटकही येथे मोठ्या संख्‍येने भेट देत असतात.

शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आलेला हा किल्‍ला सुरवातीला हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांच्या ताब्यात होता. 'पन्नग्रालय' या नावाने हा क‍िल्ला पूर्वी ओळखला जात होता. अफजलखानच्या वधानंतर अवघ्या १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1700 शतकात पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली परंतु अठराशेमध्ये किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात होता.

संत ज्ञानेश्वर महाराज

संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठेपण सर्व संतमंडळींनी मान्य केलेले, शिरोधार्य मानलेले दिसते. ज्ञानेश्वरांचे वडील बंधू आणि आध्यात्मिक गुरु संत निवृत्तीनाथांनी अरे अरे ज्ञाना, झालासि पावन तुझें तुज ध्यान कळों आलें अशी शाबासकीची पावती ज्ञानोबांना दिली. तर धाकट्या मुक्ताईने 'तुम्ही तरोनी विश्व तारा' असा सार्थ विश्वास व्यक्त केला.

येवा कोकण आपलाच असा

नारळी-पोफळींच्‍या बागा, दाट सुरूची बने आणि रम्य समुद्रकिनारे हे वैभव पहायला व अनुभवायला कुणाला आवडणार नाही. महाराष्‍ट्राच्‍या मातीत हे सौंदर्य अनुभवण्‍याची संधी मिळते परशूरामाची भूमी असलेल्‍या कोकणात. कोकणच्‍या भूमीत निसर्ग सौंदर्याचा खजिना पावला-पावलांवर अक्षरशः उधळला आहे. कोकणात तुम्हाला जितके स्‍वच्‍छ, शांत आणि पवित्र समुद्र किनारे पहायला मिळतील त्याचा अनुभव दुसरीकडे खचितच मिळेल.

सारोळ्याचे वनपर्यटन

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.

साईबाबांची शिर्डी

6587_mahasan ईश्वर हा सर्वव्यापी आहे आणि तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो अशी समानतेची शिकवण देणारे आधुनिक संत शिर्डीचे साईबाबा. साईबाबांच्या वास्तव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावाला जागतिक ओळख दिली.

छत्रपति संभाजी महाराज


मायभूमीच्‍या एका वाचकाने संकलित करून पाठविलेला संभाजी या कादंबरीतील हा उतारा. मायभूमीवर प्रेम करणा-या तमाम वाचकांसाठी....लेखन श्रेय मूळ लेखकाचेच....


गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.

पाडवा.. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद'
मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना
- काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी -
भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.

मी मुंबई बोलतेय...

- विकास शिरपूरकर

”मी मुंबई. कधी कुणी मला बॉम्बे म्हणायचं तर कुणी बंबई. त्याही आधी तर कधी मुंबा, कधी मुंबापुरी, कधी Bombaim तर कधी बंबई आणि Bombay. गेल्‍या तीन-चारशे वर्षांत मी अनेक बदल पचवले आणि रूचवले सुध्‍दा. म्हणूनच मला कुणी काय संबोधावं ही तक्रार घेऊन मी आलेलीच नाहीये. ही नावे बदलतानाच मी इतकी बदलून गेले की माझी मीच मला ओळखू येत नाहीये. पण हो मी कितीही बदलले असले तरी माझ्या वृत्ती मात्र तशाच आहेत, माझ्या लेकरांमध्येही त्या वृत्तीच सामावल्या आहेत. त्यालाच तुमच्या इंग्रजी की काय भाषेत म्हणतात ना ‘मुंबई स्पिरीट’, तेचते हे….

Gaddafi killed as Libya's revolt claims hometown

Sirte- Former Libyan leader Muammar Gaddafi died of wounds suffered on Thursday as fighters battling to complete an eight-month-old uprising against his rule overran his hometown Sirte, Libya's interim rulers said. His killing, which came swiftly after his capture near Sirte, is the most dramatic single development in the Arab Spring revolts that have unseated rulers in Egypt and Tunisia and threatened the grip on power of the leaders of Syria and Yemen. "He (Gaddafi) was also hit in his head," National Transitional Council official Abdel Majid Mlegta told Reuters. "There was a lot of firing against his group and he died."

'मूर्ती लहान, पण किर्ती महान'


एक सहा वर्षांचा मुलगा आपल्या काही मित्रांसह एका बागेत शिरला. बागेतील रंगीबेरंगी फुले पाहुन मुले हरखून गेली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर ते तोडण्यास सुरूवात केली. सर्वांनी भरभरून फुले तोडली, मात्र हा मुलगा सर्वांमध्ये लहान आणि ठेंगणा असल्याने तो मागे पडला. त्याने काही फुले तोडले तोच बागेतील माळी तिथे आल्याने सर्व मुले पळून गेली. हा सहा वर्षाचा मुलगा मात्र माळ्याच्या ताब्यात सापडला. माळ्याने सर्व मुलांचा राग या मुलावर काढून त्याला मारायला सुरूवात केली.

महात्मा गांधी

1
भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महात्माजींची जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.

प्रेम

शिकारीचा आजचा सातवा दिवस होता. संध्‍याकाळी टॉर्च आणि धनुष्‍यबाण घेऊन तो जंगलाकडे निघाला. शिकारीचा शोध सुरू झाला आणि अचानक त्‍याला आदिवासी वस्‍तीच्‍या जवळच्‍या झुडपाजवळ काही तरी दिसलं. तो थांबला. झाडाच्‍या कडेला हरण उभे होते. त्‍या हरणावर त्‍याने नेम धरला आणि बाण सोडणार तोच तो थबकला. त्‍याने पुन्‍हा त्‍या हरणाच्‍या डोळयात पाहिले आणि त्‍याच्‍या हातातला धनुष्‍यबाण निखळला...

शून्‍य मैलावरचे शहरः नागपूर

 -विकास शिरपूरकर

संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि राज्याच्या उपराजधानीचे केंद्र असलेल्या नागपूर जिल्ह्याचे पर्यटनाच्या दृष्टीनेही वेगळे महत्त्व आहे. सातपुड्याच्या पर्वतराजींमध्ये वसलेल्या नागपूरचे सौंदर्य नवेगाव बांध, सीताबर्डीचा किल्ला, दीक्षा भूमी, ड्रॅगन पॅलेस, अंबाझरी, महाराजबाग प्राणिसंग्रहालय यामुळे अधिकच खुलले आहे.


नाग नदीच्या तिरावर वसलेल्या आणि सुमारे 9 हजार 890 स्के. किलोमीटर परिसरात पसरलेल्या नागपूरची स्थापना 1702 मध्ये देवगडचा गौंड राजा बख्त बुलंद शहा याने केली. शहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान याने १७०६ साली त्याची राजधानी नागपूरला हलविली. त्याच्या काळात नागपूरचा चांगलाच विस्तार झाला. पुढे मराठ्यांनी ती ताब्यात घेतली १७४२ मध्ये रघूजीराजे भोसले सत्तेवर आले. पुढे इंग्रज राजवटीच्या काळातही नागपूरची चांगलीच भरभराट झाली.

संत गाडगेबाबा

गाडगेबाबा जाऊन आता ४० वर्षे झाली. स्वच्छतेची, साफसफाईची बाबांना खूपच आवड होती. हातात झाडू घेऊन ते सतत साफसफाई करीत असत. गाडगेबाबा म्हणजे मूर्तिमंत कडकडीत वैराग्य ! जनसेवेसाठी सर्वार्थाने झोकून दिलेले आयुष्य, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कळवळणारी कनवाळू वृत्ती, हातात एक झाडू , झाडू नसेल तेव्हा काठी. झाडू घेऊन कुठेही घाण दिसली, कचरा दिसला की तो स्वत: दूर करावयाचा, स्वत: झाडलोट करावयाची, हा बाबांचा नियम. बाबा कोणाला नमस्कार करू देत नसत. त्यांच्या पायाला कोणी हात लावलेला त्यांना चालत नसे. त्यातही कोणी पुढे घुसून पायापर्यंत येण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला हातातल्या काठीचा प्रसाद मिळे.

बॉलीवूडचा ठाकूरः संजीव कुमार

-विकास शिरपूरकर

हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेत्यांच्या यादीत संजीव कुमार यांचे नाव नेहमीच वरच्या स्थानी राहील. या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली.

9 जुलै 1930 ला सूरतमधील एका गुजराती कुटुंबात जन्मलेला हरिहर जरीवाला आपल्या अभिनयाच्या बळावर जगाला संजीव कुमार म्हणून परिचित आहे. सुमारे 25 वर्षांच्या (1960-85) मोठ्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 150 पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

मोरगावचा श्री मोरेश्वर

5734_mahas_MORESHWAR_16NOV गणेशभक्तांची आवडती 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही आरती समर्थ रामदासांना जेथे सूचली ते म्हणजे मोरगावचा मोरेश्वर मंदिर येथे. अष्टविनायकातले प्रथम आणि प्रमुख देवस्थान म्हणून या मंदिराला ओळखले जाते. पुणे सोडल्यानंतर बारामती तालुक्यात मोरगाव ६४ कि.मी. अंतरावर आहे. भूस्वानंदभूवन या नावाने देखील या गावाची वेगळी ओळख आहे. हे गाव मोराच्या आकाराचे आणि भरपूर मोर असणारे म्हणून मोरगाव या नावाने ओळखले जाऊ लागले. रेल्वे आणि बसची सुविधा असल्याने मोरेश्वराच्या दर्शनाला सहज जाता येते.

त्‍यांची वेडी मैत्री

ती, अगदी नाकासमोर चालणारी. मुलांबददल मनात एक अनामिक भीती बाळगून असलेली. कुणा मुलाशी बोलायलाही न धजवणारी. एखाद्या मुलाशी आपली घट्ट मैत्री होऊ शकेल असा विचारही तिने कधी केलेला नाही. तर त्याची स्थिती मात्र त्याहून जरा वेगळी. नवख्यांसाठी काहीसा अबोल, तर त्याला ओळखणार्‍यांच्या दृष्टीने चालते-फिरते रेडिओ स्टेशन. थोडासा मुडी म्हणा हवं तर. स्वारी रंगात असली की भरभरून बोलणार, नाहीतर घुम्म. अनेक मित्र-मैत्रिणी असलेला. मात्र तरीही एकटाच. कसल्या तरी शोधात. कदाचित मित्र-मैत्रिणींच्या गराड्यातही एखाद्या हक्काच्या अगदी जवळच्या मित्राच्या शोधात.

अनादी मी, अनंत मी

- कै. आचार्य बाळाराव सावरकर

आपल्या देशावर असलेले परकीय इंग्रजांचे राज्य नष्ट करण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्रयत्न केले. या देशभक्तांत एक गट होता शस्त्रवादी क्रांतिकारकांचा. हा गट सांगे इंग्रजांचे राज्य नष्ट करण्यासाठी आपण येथील इंग्रज अधिकार्‍यांच्या मनात भीति उत्नन्न केली पाहिजे. त्यांना शस्त्राने ठार मारले पाहिजे. या गटात 1857 चे नेते नानाराव, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रभृतिंची नावे प्रमुख आहेत.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner