येवा कोकण आपलाच असा
Posted on Wednesday, June 06, 2012 by maaybhumi desk
नारळी-पोफळींच्या बागा, दाट सुरूची बने आणि रम्य समुद्रकिनारे हे वैभव पहायला व अनुभवायला कुणाला आवडणार नाही. महाराष्ट्राच्या मातीत हे सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळते परशूरामाची भूमी असलेल्या कोकणात. कोकणच्या भूमीत निसर्ग सौंदर्याचा खजिना पावला-पावलांवर अक्षरशः उधळला आहे. कोकणात तुम्हाला जितके स्वच्छ, शांत आणि पवित्र समुद्र किनारे पहायला मिळतील त्याचा अनुभव दुसरीकडे खचितच मिळेल.
तारकर्लीचा नितळ निळा समुद्र किनारा, शिवरायांच्या आरमारी सामर्थ्याचा भव्य साक्षीदार असलेले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे जलदुर्ग, पालीचा बल्लाळेश्वर, हेदवीचा दशभूज लक्ष्मी गणेश आणि गणपतीपुळ्याचा गणराय, जोडीला दाभोळची जेट्टी, जयगडचे बॅकवॉटर्स (Back waters), सावंतवाडीची लाकडी खेळणी आणि वळणावळणाच्या घाटातून फिरताना पडत्या पावसाच्या आनंद द्विगुणीत करणारा आंबोली घाट. सारंकाही तुमच्यातील भटक्याला वेड लावणारं आहे.
मूळात 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेल्या कोकणात सृष्टीने सर्वत्र सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. नितळ सागरी किनारे, कौलारू घरं, एखाद्या चित्रासारखे वाटणारे लालमातीचे वळणा-वळणाचे रस्ते आणि सोबतीला अस्सल कोकणी मेवा. घराघरातून कोंबडी-वडे, सोलकडी, वडे सागोती, भरलेले खेकडे नाहीतर उकडीचे मोदक, काजूची उसळ आणि घावणे यांचा दरवळणारा सुगंध तोंडाला पाणी आणतो. नुकतीच बंदरावर आणलेली ताजी रसरशीत मासोळी असो नाहीतर शुद्ध व सात्विक मोदक कोकणी माणसाला दोन्ही सारखेच. म्हणूनच कोकणच्या खाद्य परंपरेत शाकाहार व मांसाहारी पदार्थांची रेलचेल दिसून येते. या सर्वांवर कळस म्हणून इथले सुगंधी रसदार हापूस आंबे... समुद्र किना-यावरील एखाद्या वाडीत, दाट झाडीत निवांत बसून हे सगळं चाखायला मिळण्यासारखा दुसरा आनंद कुठला.
कोकणात येणा-या सागरी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे तो मालवण जवळचा तारकर्लीचा (Tarkarli
Beach) किनारा. मालवण (Malvan) शहरापासून केवळ सात-आठ किलोमीटरवर असलेला तारकर्लीचा समुद्र
किनारा स्वच्छ आणि नितळ समजला जातो. त्यामुळे पर्यटन महामंडळाने येथे स्नार्कर्लिंग आणि स्कूबा डायव्हींगची सोयही केली आहे. समुद्राच्या तळाशी जाऊन सागरातील जैवविविधता अनुभवण्याचा आनंद केवळ अवर्णनीय. शिवाय इथे एमटीडीसीची (MTDC) बांबू हाऊस आणि खाजगी हॉटेल्सची संख्याही भरपूर आहे.
कोकणभूमीत पाय ठेवताच सर्वत्र निसर्ग सौंदर्य भरून राहिले आहे. अशा वेळी काय पहावे आणि काय नको याची माहिती असली तर पर्यटन व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करता येते. हे लक्षात ठेवून 'मायभूमी'ने हौशी पर्यटकांसाठी कोकणातील काही प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती निश्चितच उपयोगाची ठरेल.
कोकणात जाताय हे नक्की पहाः
रायगड- अलिबाग, आक्षी नगाव बीच, खोपोली, कर्नाळा पक्षी अभयारण्य, पालीचा बल्लाळेश्वर, किहीम बीच,
उमरठ, घारापुरी, दिवेआगार, रायगडचा किल्ला, माथेरान, मुरूड-जंजिरा, श्रीवर्धन
रत्नागिरी- गणपतीपुळे, रत्नागिरी, संगमेश्वर जवळील प्रचितगड, तिवरे धबधबा, दापोलीचा समुद्र किनारा, हेदवीचा दशभूजा गणेश, सुवर्णदुर्ग किल्ला.
सिंधुदुर्ग- आंबोलीचे धबधबे, तारकर्लीचा समुद्र किनारा, कुणकेश्वर, मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग,
सावंतवाडीचा राजवाडा.