Showing posts with label kokan bhumi. Show all posts
Showing posts with label kokan bhumi. Show all posts

येवा कोकण आपलाच असा

नारळी-पोफळींच्‍या बागा, दाट सुरूची बने आणि रम्य समुद्रकिनारे हे वैभव पहायला व अनुभवायला कुणाला आवडणार नाही. महाराष्‍ट्राच्‍या मातीत हे सौंदर्य अनुभवण्‍याची संधी मिळते परशूरामाची भूमी असलेल्‍या कोकणात. कोकणच्‍या भूमीत निसर्ग सौंदर्याचा खजिना पावला-पावलांवर अक्षरशः उधळला आहे. कोकणात तुम्हाला जितके स्‍वच्‍छ, शांत आणि पवित्र समुद्र किनारे पहायला मिळतील त्याचा अनुभव दुसरीकडे खचितच मिळेल.

सारोळ्याचे वनपर्यटन

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.

विजयदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्‍या उत्तरेला वाघोटणे खाडी परिसरात शिवाजी महाराजांनी बांधलेला विजयदुर्ग हा भक्कम जलदुर्ग आहे मराठेशाहीच्‍या समृद्ध व बळकट आरमारी ताकदीचे प्रतिक म्हणून दिमा़खात उभा आहे. येथून जवळच देवगडचा किल्‍ला, वाडा येथील विमलेश्‍वर मंदीर आणि सैतवडेचा धबधबा ही देखिल पाहता येण्‍यासारखी ठिकाणे आहेत.

स्‍वराज्याची राजधानीः रायगड

छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे त्यांनी या गडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला. तत्पूर्वीच्या इतिहासकाळात हा गड `रायरी' या नावाने ओळखला जात असे.

मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. संपर्काच्या दृष्टीने व कारभाराच्या दृष्टीने तो शिवरायांना इतर किल्ल्यांपेक्षा अधिक सोयीचा वाटला. रायगड येथे राजधानी असल्याने या किल्ल्यात सर्व सोयीसुविधा होत्या.

पावसाळी पर्यटन स्‍थळः आंबोली

बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्‍या टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्‍या दर्‍या. पावसाळ्याच्या दिवसात तर या दर्‍या अधिकच सुंदर दिसतात.

सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. तत्कालीन सावंतवाडी संस्थानाची ही उन्हाळ्यातील राजधानी. या आंबोलीमध्ये अजुनही आपणास संस्थानकालीन भव्य इमारती पहावयास मिळतात.

सिंधुदुर्ग किल्ला

5878_mahasanskriti छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी

गणपती पुळे

7584_Mahas गणपती ही पुरातन काळापासून द्वारपाल देवता राहिली आहे. म्हणूनच भारतामध्ये चार दिशांना चार अशी गणपतीची महास्थाने आहेत. त्यापैकी एक म्हणजे गणपती पुळे. विस्तीर्ण समुद्र किनारा, नारळी पोफळीची दाटीवाटीने उभी असलेली झाडे असा सुंदर निसर्ग लाभलेले हे गणपती स्थान पर्यटनाच्या दृष्टीने देखील लोकप्रिय आहे.

कान्‍होजींच्‍या कारकीर्दीचा साक्षीदारः सुवर्णदुर्ग

1644100118145724624 महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न अशा कोकणच्या किनारपट्टीवर मोठ्या दिमाखात सुवर्णदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग उभा आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली या तालुक्यामध्ये आहे. दापोली पासून १६ कि.मी. अंतरावर हर्णे बंदर आहे. हर्णे बंदराच्या सागरात सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आहे.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner