महागाई आणि कृषी मंत्रालयाचा संबंध नाहीः पवार
पुणे
महागाई वाढली या गोष्टीशी कृषी मंत्रालयाचा संबंध तरी काय असे नवीन वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्री शरद पवार यांनी केले असून महागाई वाढली म्हणून कृषी मंत्र्याला जबाबदार धरले जात असल्याच्या बातम्या मी गेल्या 40 वर्षांत प्रथमच ऐकतो असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दुधाच्या दरवाढीहीशी आपला संबंध नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
महागाई हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असून त्याबाबत एकट्या कृषी मंत्र्याला जबाबदार धरता येणार नाही, असे सांगून ना. पवार म्हणाले, की या प्रकाराची सर्वस्वी जबाबदारी कृषी मंत्र्यावर टाकण्याचा माध्यमांचा प्रयत्न असून अशा प्रकारच्या बातम्या मी गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदाच ऐकतो आहे.
मायावती यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणी संदर्भात पवार म्हणाले, की मायावती यांनी माझ्या राजीनाम्याचा विचार करण्यापेक्षा राज्यातील आपल्या प्रकल्पाकडे लक्ष द्यावे. कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने मायावती चीडल्या असून त्यांनी त्यातूनच राजीनाम्याची मागणी केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, दुधाच्या किंमती वाढण्याची शक्यता पवार यांनी केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये दुधाचे दर दोन ते तीन रुपयांनी वाढले आहेत. याबाबत जबाबदारी घेण्यास नकार देताना पवार यांनी दर वाढीशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे
No Response to "महागाई आणि कृषी मंत्रालयाचा संबंध नाहीः पवार"
Post a Comment