डॉल्‍फीन राष्‍ट्रीय जलजीव घोषित

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk



नवी दिल्ली

गंगा नदीत आढळणा-या सध्‍या आपल्‍या अस्तित्वाचा लढा देणा-या डॉल्‍फीन माशांना सरकारने भारताचा राष्ट्रीय जल जीव घोषित केले असून त्‍यांच्‍या संरक्षण आणि संवर्धनासाठी व्‍यापक मोहीम अवलंबणार असल्‍याचे जाहीर केले आहे.

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्‍या प्रवक्‍त्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरच्‍या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) आकडेवारीनुसार जगात 2,000 डॉल्‍फीन शिल्‍लक असून अवैध शिकार आणि नदीत सोडल्‍या जाणा-या कचरा आणि रासायनिक पाण्‍यामुळे डॉल्‍फीनच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

त्‍यांनी सांगितले, की राष्ट्रीय गंगा नदी बेसिन आयोगाने गेल्‍या वर्षी पाच ऑक्टोबर रोजी आपल्‍या पहिल्‍या बैठकीत डॉल्‍फीनला भारताचा राष्ट्रीय जल जीव घोषित करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "डॉल्‍फीन राष्‍ट्रीय जलजीव घोषित"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner