Showing posts with label special. Show all posts
Showing posts with label special. Show all posts

लोकमान्‍यांची लोकमान्‍यता

- विकास शिरपूरकर

ब्रिटीशांनी भारतावर 150 वर्षे राज्य केलं. इतकी वर्षे त्यांना आपल्याला गुलाम बनवून ठेवणे शक्य झालं कारण जातीपातीच्या धर्माधर्माच्या भिंतींमध्ये विभागला गेलेला भारतीय समाज. देशाला स्वातंत्र्य हवे असेल तर आधी या विखुरल्या गेलेल्या समाजाला एकत्र आणण्याची जातीजातीमधील तेढ कमी करण्याची आवश्यकता असल्याचे लोकमान्य टिळकांनी ओळखले.

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा...

भारताच्या इतिहासात अनेक राजांनी जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. परंतु छ‍त्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये एक मूलभूत फरक होता. बहुतांश राजांनी आपापल्या वाडवडिलांच्या राजगादीवर विराजमान होऊन गादी चालविली. पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र त्याला अपवाद होते. ते स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती.

विक्रमवीर सचिन झाला 37 वर्षांचा

मुंबई

क्रिकेटचा ईश्‍वर म्हणून ओळखल्‍या जात असलेल्‍या विक्रमवीर सचिन तेंडुलकर शनिवारी आपला 37 वा वाढदिवस साजरा करत असून दरवर्षा प्रमाणेच यंदाही सचिन आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्याची शक्यता आहे. 


रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो उपचारासाठी श्रीलंकेला रवाना झाला आहे. त्यामुळे अंतिम फेरीच्या लढतीत त्याच्या सहभागावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून, क्रिकेटप्रेमी येत्या रविवारी होणार्‍या अंतिम सामन्यापूर्वी तो पूर्णतः तंदुरुस्‍त व्‍हावा यासाठी देव पाण्‍यात बुडवून बसले आहेत.

इंडियन मुजाहिदीन कोण?

जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्‍लीलाही हादरवून सोडणारी 'इंडियन मुजाहिदीन' ही दहशतवादी संघटना 'आयएसआय'च्‍या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्‍याचे काम करण्‍यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्‍द युध्‍द पुकारण्‍यास प्रवृत्त केले जाते.

इंडियन मुजाहिदीन कोण?- भारतात धर्मिक विद्वेश पसरवून देशाच्‍या एकतेला आणि अखंडतेला धोका पोचविण्‍याच्‍या उद्देशाने 'सिमी'ची (स्‍टुडंट्स इस्‍लामिक मुव्‍हमेंट ऑफ इंडिया) स्‍थापना करण्‍यात आली आहे. या दहशतवादी कारवाया करणा-या संघटनेवर बंदी आणण्‍याचा निर्णय केंद्राने घेतल्‍यानंतर देशभर या संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांना अटक करण्‍यात आली. त्‍यामुळे भारतात सिमीच्‍या कारवायांवर बंधने आली. यातून पळवाट करण्‍यासाठी सिमीने आपल्‍या नावात बदल करून 'इंडियन मुजाहिदीन' हे नाव धारण केले आहे. याशिवाय सिमीचे आणखीही अनेक संघटनांशी संबंध आहेत.

शिवछत्रपतींची आरती

- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या अंगचे सर्व गुण आणि सर्व शक्ती केवळ देशभक्तीच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूमीच्या चरणी वाहिल्या. सावरकर सर्वप्रथम देशभक्त होते आणि नंतर महाकवी, समाजसुधारक, लिपीसुधारक, रणझुंजार नेते होते.

सावरकरांचे हे जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांच्या बालपणापासूनच स्पष्ट होत होते. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात आर्य संघ या नावाच्या भोजन संघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हटली जावी म्हणून सावरकरांनी श्री शिवाजी महाराजांची आरती लिहिली.

माजी उपराष्‍ट्रपती भैरवसिंह शेखावत

- विकास शिरपूरकर

'राजस्‍थान का एकही सिंह- भैरोंसिंह भैरोंसिंह' या घोषणेने आपल्‍या असंख्‍य चाहत्यांच्‍या पाठिंब्यावर तीन वेळा राजस्‍थानच्‍या मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान झालेले भैरवसिंह शेखावत हे राजस्‍थानातील भाजपचे तगडे नेते समजले जात होते. स्‍वातंत्र्य प्राप्‍तीनंतरच्‍या कॉंग्रेसच्‍या लाटेत या पक्षाला कडवी झुंज देणा-या या नेत्यामागे शेतकरी, ठाकूर, राजपूत, ब्राह्मण, शिख आणि जैन व मुस्लिम समुदायाचाही मोठा पाठिंबा होता.

महाराष्‍ट्र दिन

-ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने
प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषात महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले. नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंतांनी गायिली आहे. तर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापटांनी दिली आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ


मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे. अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉस्मोपॉलिटिन आहे, ती कुण्या एका भाषिकांची नाही, असे उच्चरवाने इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी ही मुंबई मिळविण्यासाठी १०५ मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे, ही बाब विसरता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास अंगावर रोमांच आणणारा आहे, तो वाचला की मुंबईसाठी मराठी माणसाने काय मोजले आहे, ते कळते.

दलितांचे ‘बाबा’ गेले

- आचार्य अत्रे

भारतीय राज्‍यघटनेचे शिल्‍पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या महापरिनिर्वाणानंतर त्‍यांच्‍या स्‍मृती जागृत  करणारा आचार्य प्र.के.अत्रे यांनी लिहीलेला मृत्यू लेख जसाचा तसा 'मायभूमी'च्‍या वाचकांसाठी...

बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला.

शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.

कुंभमेळ्यात दहा लाख भाविकांचे गंगा स्‍नान

हरिद्वार


उत्तराखंडच्‍या हरिद्वारमध्‍ये सुरू असलेल्‍या कुंभमेळ्यात दुस-या शाही स्नानास सुरूवात झाली असून सोमवती अमावस्येनिमित्त आज लाखो भाविकांनी गंगेत स्‍नान केले. येथील हर की पौड़ी, मालवीय द्वीप, सुभाष घाट आणि गौघाटावर काल रात्री 12 वाजेपासून स्नानास सुरूवात झाली आहे.


शेकडो वर्षांनंतर कुंभमेळ्या दरम्यान सोमवती अमावस्या आल्‍याने या दुर्मिळ दिनाचे औचित्‍य साधून लाखो भाविक हरिद्वारमध्‍ये दाखल झाले आहेत.

ऑल इज नॉट वेल...

BALASAHEB THAKARE- विकास शिरपूरकर 

आमच्‍या लहानपणी आम्ही शाळेत रोज सकाळी एक प्रतिज्ञा घोकत असू... 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...' ही प्रतिज्ञा आता बदलावी लागते की काय असं गेल्‍या काही दिवसांपासून मला राहून-राहून वाटतं आहे. माझ्या काना-मनात गेल्‍या काही दिवसांपासून 'महाराष्‍ट्र माझा देश आहे. सारे मराठी माझे बांधव आहेत...' अशा ओळी घुमताहेत. यात 'मुंबई फक्त महाराष्ट्राची आहे' अशी आणखी एक ओळ अधिक जोराने म्हणण्‍यासाठी

मागल्या-पुढल्या पिढीत संवाद गरजेचा


भारतीयत्व म्हणजे काही स्वर्गातून प्राप्त होणारं एखादं रसायन नाहीये. भारतीयांनी संकल्पपूर्वक धारण केलेला धर्म आहे. भारतीयत्व म्हणजे जात, धर्म किंवा वर्गनिदर्शक शब्दही नाही. भारतातील सर्वजाती, समुदाय, सर्व वर्गांना मान्य, स्वीकारार्ह जे काही आहे, ते म्हणजे भारतीयत्व आहे. यात सर्व जाती, समुदाय आणि वर्गांचा समावेश आहे.

राष्ट्रध्वजाचा मान राखा

15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिtricolorन व २6 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करी‍त असतो. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना घरदार सोडावे लागले आहे. एवढेच नाही तर आज बॉर्डरवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र जागून देशाचे आपल्या शत्रूपासून संरक्षण करीत आहे. म्हणूनच तर आपण आपल्या आलिशान घरांमध्ये स्वस्थ आहोत. मात्र गेल्या काही वर्षापासून आपल्या देशाचे मानचिन्ह 'तिरंगा' झेंड्याची अवहेलना होत असल्याचे दिसत आहे.

इथियोपियन विमान समुद्रात पडल्‍याने 92 बेपत्ता

बेरूत
लेबनानची राजधानी बेरूतमधून सोमवारी सकाळी उड्डाण घेतल्‍यानंतर काही वेळातच इथोपियाचे एक विमान भूमध्‍य समुद्रात पडले आहे. या विमानात 92 प्रवासी होते. अपघातातानंतर लगेच बचाव पथके रवाना झाली असून प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. अपघातात किती लोक बचावले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
इथेपियन एअर लाईन्‍सचे 409 विमान रात्री 2.30 वाजेच्‍या सुमारास (भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता) ड्डाण घेतल्‍यानंतर अवघ्‍या पाचच मिनिटात अपघातग्रस्‍त झाले आहे. विमानात 83 प्रवाशी आणि नऊ चालक दलाचे सदस्‍य होते.

शाही स्नानाच्या संघर्षाचा इतिहास

पहिला शाही स्नान 12 फेब्रुवारीला img1091231039_1_1
येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भारतभरातील लाखो साधु-संतांचे आगमन झाले आहे. कुंभमेळ्यातील पहिला स्नान 14 जानेवारीला मकरसंक्रांतीच्या शुभ पर्वावर संपन्न झाला आहे. शाही स्नान या महाकुंभमेळ्यातील विशेष आकर्षण मानले जाते. 12 जानेवारीला महाशिवरात्रीला पहिला शाही स्नान, 15 मार्चला सोमवती अमावास्येला दुसरा तर तिसरा शाही स्नान 14 एप्रिलला मेष संक्रांतीच्या शुभपर्वावर आहे. शाही स्नानासंदर्भात मागील पाने उलटविली असता अखाडे, साधु, विविध संप्रदाय यांच्यात खुनी संघर्ष दिसून येतो.

कुंभमेळा: प्रशासनाची कसरत

- महेश पाण्डे
21 व्या शतकातील पहिला महाकुंभमेळ्यासाठी उत्तराखंड राज्य सरकारने 500 कोटी रूपयांचा खर्च करण्याचा दावा केला आहे. नियोजन व सुरक्षा व्यवस्था चोख करण्‍यात आली आहे की, यापूर्वी कधीच करण्‍यात आलेली नव्हती. जर आपण इतिहासाची पाने उलटविली असता आपल्याला येथे जमलेल्या लाखो साधु, भाविकांमध्ये झालेल्या खूनी संघर्षामुळे कुंभमेळ्याचा रंग फिका झालेला दिसतो.

शाही स्नान: मुख्य आकर्षण

महेश पांडे
15310011485917766 कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाही स्नान असतो. शाही स्नानासाठी लाखोंच्या संख्येने साधु, भाविक निघतात. दरम्यान विविध आखाड्यांचे आयोजन केले जाते. त्यात एकात्मतेचे दर्शन दिसून येते. त्यातून सात्विक भावनाही प्रगट होतांना दिसतात. वैष्णवी आखाडे अठरा आखाड्‍याचे प्रतिनिधित्व करीत असतात. वैष्णवी आखाड्‍यातील 'महंत्त' ही पदवी प्राप्त करण्‍यासाठी नवोदीत संन्यास्याला अनेक वर्षांची सेवा करावी लागत असते.

मानवतेचा संगम 'कुंभमेळा'

- संदीप पारोळेकर
15310011612553773 भारतीय संस्कृतीत कुंभमेळ्याचे खूप महत्त्व आहे. पुरणानुसार हा एकमात्र मेळा, सण व उत्सव आहे की त्यात मानवतेचा संगम होत असतो. हिंदुबांधव एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करताना दिसतात. भारतीय संस्कृतीत ही परंपरा फार प्राचीन आहे. त्याचा उल्लेख आपल्याला पुराणात सापडतो. प्राचीन काळी ऋषीमुनी नदीकाठी एकत्र येऊन मोठे अध्‍यात्मिक कार्य करत असत तसेच एखाद्या रहस्यावर विचारविनीमय करत असत आणि आजही ही परंपरा कुंभमेळ्याच्या रूपाने सुरू आहे. संपूर्ण भारतातून लाखो भाविक गंगा नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी हजेरी लावत असतात.

कुंभमेळा: तीन प्रचल‍ित कथा

श्री गोपाळदत्त शास्त्री महाराज हे रामानुज IND1458B संप्रदायाचे प्रमुख आहेत. 'कुंभ महात्म्य' हे त्यांचे स्वलिखीत पुस्तक. त्यांनी यात कुंभमेळ्याविषयी महर्षि दुर्वासांची कथा, कद्रू-विनताची कथा व समुद्रमंथनाची कथा या तीन प्रचलित कथांचा समावेश केला आहे. त्या पुढील प्रमाणे... 

महर्षि दुर्वासांची कथा
या कथेत इंद्रदेव आणि दुर्वासा ऋषी यांचा प्रसंग आला आहे. दुर्वासा ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहाराचा इंद्रदेवाकडून अपमान झाला होता. तो अपमान ऋषींना सहन झाला नव्हता. सविस्तर कथा अशी की

कुंभमेळ्यात अन्नदानाला महत्त्व

sans05 हरिद्वार येथे कुंभमळ्यात दरम्यान अन्नदान व तिळदानचे खूप महत्त्व आहे. येथे थोडेही दान केल्याने मनाप्रमाणे फळ मिळत असते, अशी भाविकांची धारणा आहे. तसेच माघा मासात अन्नदानाचे विशेष महत्त्व असल्याचे पुराणात सांगितले आहे. । अन्न हा केवळ शरीराच नाही तर आपल्या जीवनाचा आधार असून अन्नदान हे प्राणदानासमान आहे. इतर दानधर्माच्या तुलने अन्नदानाला अन्यंन साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

'कुंभमेळा' हा वेदकाळापासून प्रचलित आहे, असे मानले जाते. समुद्रमंथनातून जे अमृत बाहेर निघाले होते. त्याचे चार थेंब त्र्यंबकेश्वर, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार या चार तीर्थक्षेत्रावर पडल्याने येथे कुंभमेळा भरतो.

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner