कुंभमेळ्यात दहा लाख भाविकांचे गंगा स्‍नान

Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk

हरिद्वार


उत्तराखंडच्‍या हरिद्वारमध्‍ये सुरू असलेल्‍या कुंभमेळ्यात दुस-या शाही स्नानास सुरूवात झाली असून सोमवती अमावस्येनिमित्त आज लाखो भाविकांनी गंगेत स्‍नान केले. येथील हर की पौड़ी, मालवीय द्वीप, सुभाष घाट आणि गौघाटावर काल रात्री 12 वाजेपासून स्नानास सुरूवात झाली आहे.


शेकडो वर्षांनंतर कुंभमेळ्या दरम्यान सोमवती अमावस्या आल्‍याने या दुर्मिळ दिनाचे औचित्‍य साधून लाखो भाविक हरिद्वारमध्‍ये दाखल झाले आहेत.


त्‍यात देशातील विविध राज्‍यांसह विदेशातूनही मोठ्या संख्‍येने भाविकांनी उपस्थिती लावली आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "कुंभमेळ्यात दहा लाख भाविकांचे गंगा स्‍नान"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner