सोमवारपासून सारेगमपचे नवे पर्व
Posted on Sunday, April 25, 2010 by maaybhumi desk
आयडिया सारेगमपची आत्तापर्तंत सात पर्वं संपली. प्रत्येक पर्वाने दिला एकेक महाविजेता पण या महाविजेत्यांबरोबरच या सगळ्याच पर्वांमध्ये आपापली विशिष्ट अशी शैली असलेले खास गायक -गायिका या पर्वांमधून महाराष्ट्राला मिळाले. गायकीचे विशिष्ट पैलू असलेल्या या गायकांना घेऊन आता रंगणार आहे आयडिया सारेगमपचा महामंच!
भक्तिरसातील गाणी म्हटली की, आजच्या काळातलं एकमेव नाव समोर येतं ते ज्ञानेश्वर मेश्रामचं. गझल गायकीत माहिर असलेला विजय गटलेवार, नव्या युगाची रॉक गर्ल संहिता चांदोरकर, अवघ्या तरुणाईला साद घालणारा तरुणांचा लाडका मंगेश बोरगावकर, गायकीतले वेगवेगळे प्रयोग करणारा डॉ अनिकेत सराफ, शास्त्रीय संगीताची परंपरा सुरु ठेवणारे सायली ओक आणि अनिरुद्ध जोशी, एकीकडे मधुर भावगीते आणि दुसरीकडे लावणीचा ठसका देणारी आनंदी जोशी, प्रांताच्या, भाषेच्या सीमा ओलांडणार्या अपूर्वा गज्जला आणि चतुरस्र गायकीतला सर्वांचा आवडता राहूल सक्सेना हे कालचे लोकप्रिय आणि आजचे गुणवंत दहा गायक सज्ज झालेयत उद्याचे स्वरवंत होण्यासाठी ! सुरांच्या या दरबारात लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते परीक्षक म्हणून कामगिरी सांभाळणार असून त्याच्या बरोबरच एक मान्यवर परीक्षक प्रत्येक मैफलीत सहभागी होतील. तर सूत्रसंचालकाची जबाबदारी पल्लवी जोशी सांभाळणार आहे.

वाचण्यासारखे आणखीही काहीः
bollywood
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 204 weeks ago
Matrimony in Bangladesh