भारताने केली डब्ल्यूएचओच्या चौकशीची मागणी
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्वाइन फ्लूच्या व्हायरस संदर्भात केलेल्या दाव्याच्या चौकशीची मागणी भारताने केली आहे. डब्ल्यूएचओने केलेल्या स्वाईन फ्लूच्या दाव्यामुळे औषधी कंपनींचा फायदा झाल्याचा आरोप केला जात असून त्याबाबत स्पष्टता समोर येण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी एका कार्यक्रमात सांगितले, की केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून या तपासातून सत्य समोर येणार आहे. याबाबत पाश्चिमात्य देशांतील माध्यमांनीही गंभीर भूमिका घेतली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "भारताने केली डब्ल्यूएचओच्या चौकशीची मागणी"
Post a Comment