चीनकडून भारतासमोर मैत्रीचा प्रस्‍ताव

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

बीजिंग

भारत आणि चीन हे एकमेकांचे विरोधक नसून मित्र राष्‍ट्र आहेत. जर चीन आणि भारताने एकमेकांच्‍या हातात हात गुंफून समृध्‍दी मिळवली जर पुढचे शतक आशियाचे असेल, असे प्रतिपादन चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी केले आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग मंत्री आनंद शर्मा यांच्‍याशी चर्चा करताना जियाबाओ बोलत होते. सध्‍या शर्मा चीनच्‍या दौ-यावर आहेत.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार जियाबाओ म्हणाले, की भारत आणि चीन आशियातील सर्वांत मोठे विकसनशील देश असून दोन्‍ही देशांत जगातील लोकसंख्‍या 40 टक्के लोक राहत असून आपण सहकार्याची व्‍याप्ती वाढवून विकासाच्‍या दिशेने पुढे जाऊ शकतो.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "चीनकडून भारतासमोर मैत्रीचा प्रस्‍ताव"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner