तीन वर्षांत पुण्‍यात धावणार 'मेट्रो'

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

पुणे

दिल्ली मेट्रो ट्रेन कॉर्पोरेशनने पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन स्थापन करण्या संदर्भात सादर केलेला प्रस्ताव पुणे महापालिकेने मान्‍य केला असून मेट्रोला मंजुरी दिल्‍याने पुढील तीन-चार वर्षांत पुण्‍यातही मेट्रो रेल्‍वे धावणार आहे.

पुणे महापालिकेने हा प्रस्ताव मंजूर करतानाच सुमारे 32 कि.मी. चा निगडी-कात्रज मार्गही आपल्‍या टप्‍प्‍यात यावा यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करण्‍याचा निर्णय घेतला आहे. सहा हजार कोटींच्या या प्रकल्‍पासाठी बांध, वापरा व हस्‍तांतरीत करा (बीओटी) तत्वावर निविदा मागविण्यात येणार असून प्रकल्‍पासाठी प्रत्येकी 20 टक्के निधी केंद्र व राज्य सरकारकडून तर उर्वरित 60 टक्के निधी खाजगी क्षेत्रातून उभारण्‍याचा प्रस्ताव आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "तीन वर्षांत पुण्‍यात धावणार 'मेट्रो'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner