सिम्बायोसिसच्‍या शंभरावर विद्यार्थ्‍यांना विषबाधा

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

पुणे

पुण्यातील सिम्बायोसिस मॅनेजमेंट स्कूलमधील सुमारे 114 विद्यार्थ्यांना होस्‍टेलच्‍या अन्नातून विषबाधा झाली असून, यापैकी वीस विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या विद्यार्थ्यांवर पुण्‍यातील मेडिपॉईंट, रुबी, रत्ना आणि बिर्ला या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

पोलिसांना या विषयीची माहिती उशीराने देण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सिम्‍बायोसिसच्या व्यवस्थापनाने यासंदर्भात अद्याप काहीही बोलण्यास नकार दिला आहे. विषबाधा होणा-या मुलांची संख्‍या वाढण्‍याची शक्यता असून खबरदारी म्हणून रात्री होस्‍टेलच्‍या मेसमध्‍ये जेवण करणा-या सर्व विद्यार्थ्‍यांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्‍यात आली आहे. 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सिम्बायोसिसच्‍या शंभरावर विद्यार्थ्‍यांना विषबाधा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner