राहुल गांधींचे रस्‍त्यावर फोटो सेशन

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

पणजी20090425071007rahul_gandhi416
इंटरनेटच्‍या जगतात कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी सर्वाधिक सर्चेबल आहेत. तर तरुणींमध्‍येही ते मोस्‍ट एलिजीबल बॅचलर म्हणून प्रसिध्‍द आहेत. पण समजा एखाद्या मुलीला पाहून राहुल गांधींनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि तिच्‍या जवळ येऊन तिच्‍यासोबत फोटो काढून घेतले तर, त्‍याचा अर्थ काय? गोव्‍यातील लोक‍ आणि गोवा विद्यापीठाचे विद्यार्थी हेच समजून घेण्‍यात सध्‍या गुंतलेले आहेत.

त्‍याचं झालं असं, की राहुल गांधी मंगळवारी गोवा विद्यापीठात येणार होते. राहूल गांधी येणार म्हणून गोवा विद्यापीठाची (जीयू) मास्टर डिग्रीची एक विद्यार्थिनी जीयूच्‍या बस स्टॉपवर उभी होती. कदाचित राहुलला पाहून त्‍याचा फोटो आपल्‍या मोबाईलमध्‍ये काढून घेण्‍यासाठी ती उभी असावी.

राहुलच्‍या गाड्यांचा ताफा विद्यापीठ कॅम्पसमधून बाहेर निघत असताना अचानक त्‍यांची नजर त्‍या मुलीवर गेली. त्‍यांनी गाडी थांबवली तरुणीकडून मोबाइल घेतला आणि तिच्‍यासह आपला फोटो काढून घेतला.
राहुल निघून गेल्‍यानंतर मीडिया चॅनल्‍सच्‍या प्रतिनिधींनी तिला घेराव घालून विचारपूस सुरू केली. मात्र तिने स्‍वतःबद्दल काहीही माहिती देण्‍यास नकार दिला. आणि आपल्‍या बसमध्‍ये बसून निघून जाण्‍यापूर्वी आपले नाव फ्रिडा पिंटो असल्‍याचे सांगितले. ऑस्‍कर विजेत्‍या स्‍लमडॉग मिलिओनियरच्‍या अभिनेत्रीचे नावही फ्रिडा पिंटोच आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "राहुल गांधींचे रस्‍त्यावर फोटो सेशन"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner