दादरच्या गोल्डमोहर मिलला भीषण आग
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
मुंबई
दादरमध्ये दादासाहेब फाळके रोडवरील दाट वस्तीच्या भागात असलेल्या गोल्डमोहर मिलला भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे बावीस बंब आणि पाच टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिलला लागलेली आग इतकी भीषण आहे, की त्याच्या ज्वाळा आणि धूर दूरवरूनही पाहता येऊ शकतो.
मिलचे सात ते आठ मजले पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असून परिसरात कापड दुकाने आणि रहिवासी भाग असल्याने आग पसरू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
आगीमुळे या रस्त्यावरील वाहतुक दुस-या बाजूने वळवण्यात आल्याने रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली असून या संपूर्ण भागात मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "दादरच्या गोल्डमोहर मिलला भीषण आग"
Post a Comment