यापुढे मुंबईत केवळ 'मराठी'च टॅक्सी चालक
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
मुंबई
मराठी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मनसेने केलेल्या आंदोलनाचे परीणाम आता दिसू लागले असून यापुढे मुंबईत टॅक्सी चालविण्याचे परवाने केवळ मराठी येत असलेल्यांनाच देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास कॅबिनेटने मंजुरी दिली असून यापुढे टॅक्सी चालवण्याचा परवाना घेण्यासाठी उमेदवाराला मराठी येणे ही प्रमुख अट असणार आहेत. तसेच संबंधित व्यक्ती मुंबई व महाराष्ट्राची किमान 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून रहिवासी असावी लागणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "यापुढे मुंबईत केवळ 'मराठी'च टॅक्सी चालक"
Post a Comment