प्रजासत्ताक संचलनात यंदा 'अवाक्स'ही
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात ‘अवाक्स’चाही समावेश केला जाणार आहे. एअरबोर्न वार्निंग एण्ड कंट्रोल सिस्टम (अवाक्स) देशातील सर्वांत हायटेक हेरगिरी यंत्रणा असून गेल्या वर्षीच त्याचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.
आकाशातून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष्य ठेवणा-या ‘अवाक्स’चा प्रथमच प्रजासत्ताक दिन संचालनात सहभागी असणार आहे. या वर्षी मार्चपर्यंत आणखी दोन अवाक्स हवाई दलात सामील करून घेतले जाणार आहेत.
अवाक्स व्यतिरिक्त या संचलनात आयएल-78 विमान, दो एएन-32 विमाने, चार एमआई-17 हेलिकॉप्टर्स, पाच जॅग्वार आणि पाच मिग-29 आणि सुखोई-30 चा समावेश असणार आहे. संचलात एकूण 30 विमाने असणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "प्रजासत्ताक संचलनात यंदा 'अवाक्स'ही"
Post a Comment