रहमानला यंदाही ऑस्करसाठी नामांकन!
Posted on Tuesday, January 19, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
गेल्या वर्षी स्लमडॉग मिलिनियर या चित्रपटातील 'जय हो' गाण्यासाठी प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार मिळविणार्या संगीतकार ए. आर. रहमानला यंदाही या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे.
रहमानने हॉलीवूडच्या कपल्स रिट्रीट या चित्रपटासाठी संगीत दिले असून त्यात 'ना ना' हे तमिळ गाणे आहे. ऑस्कर नामांकनासाठी निवडण्यात आलेल्या ६३ गाण्यांत या गाण्याचा समावेश झाला आहे. अर्थात, ऑस्करचे नामांकन अधिकृतपणे अद्याप जाहिर झालेले नाहीत. ते येत्या दोन फेब्रुवारीला जाहिर होणार आहेत. पण रहमानने त्याच्या गाण्याला नामांकन मिळाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.
त्याच्या या अल्बममध्ये इंग्रजी, आफ्रिकन, हिंदी, स्पॅनिश आणि संस्कृत गाणी आहेत. भारतात हा अल्बम रिलीज झाल्यानंतर जोरदार धुमाकूळ घालेल असा अंदाज आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "रहमानला यंदाही ऑस्करसाठी नामांकन!"
Post a Comment