सुभाष घई करणार हिरोचा रिमेक !

Posted on Tuesday, January 19, 2010 by maaybhumi desk

subhash ghai (Hero) सुभाष घई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका स्टारपुत्राला ते आता बॉलीवूडमध्ये आणताहेत. घईंनी ८० च्या दशकात जॅकी श्रॉफला हिरो या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये आणले होते. आता घई त्याच हिरोचा रिमेक करणार असून यात जॅकीचा मुलगा टायगर मुख्य भूमिकेत असेल. या चित्रपटाची निर्मिती घईंच्याच मुक्ता आर्टसतर्फे होणार आहे. मात्र, त्याचे दिग्दर्शन नव्या दमाच्या दिग्दर्शकाकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची पटकथा तयार करण्याचे काम सुरू आहे. नायक म्हणून टायगर श्रॉफचे नाव निश्चित झाले असले तरी नायिका व इतर कलावंतांची नावे अजून निश्चित झालेली नाहीत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सुभाष घई करणार हिरोचा रिमेक !"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner