बगदादमध्‍ये स्‍फोट, पाच जण ठार

Posted on Tuesday, January 19, 2010 by maaybhumi desk

बगदाद

इराकची राजधानी बगदादमध्‍ये एका दहशतवाद्याने एका स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या कार्यालयात केलेल्‍या अंदाधुंद गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत.
स्थानिक सुरक्षा प्रमुख नबील अल कैसी यांनी या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार हल्‍लेखोराने एनजीओ कार्यालयाच्‍या प्रवेश द्वाराजवळ एक बॉम्ब लावला होता. सुरक्षा दलाचे लोक येथे आले त्यावेळी येथे झालेल्‍या जोरदार स्‍फोटात काही जण जखमी झाले असून काही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या संदर्भात अधिकृत आकडेवारी समजू शकली नाही.
बगदादच्‍या सुन्नी बहुल भागात झालेल्‍या या हल्‍ल्‍यात बिना आवाजाच्‍या शस्‍त्रांचा वापर केला गेला होता.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "बगदादमध्‍ये स्‍फोट, पाच जण ठार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner