फ्रीडा झाली बॉंड गर्ल!

Posted on Monday, March 22, 2010 by maaybhumi desk

स्लमडॉग मिलिनियर या चित्रपटामुळे जगप्रसिद्धी लाभलेली भारतीय अभिनेत्री फ्रीडा पिंटो पुढची बॉंड गर्ल असण्याची शक्यता आहे. यात जेम्स बॉंडच्या भूमिकेत डॅनियल क्रेग असेल. ही बातमी पक्की असून लवकरच तिची घोषणा केली जाईल, असे कळते.


फ्रीडाने बॉंड गर्लच्या भूमिकेपर्यंत मजल मारून अनेक नायिकांना आपल्या नावे बोटे मोडायला भाग पाडले आहे. त्यात हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतच्या नायिका आहेत. स्लमडॉगने फ्रीडाचे आयुष्यच बदलून टाकले आहे. ती थेट आता वर्ल्ड स्टार झाली आहे.


फ्रीडा आधी बॉंड गर्लची भूमिका स्वीकारण्यात उत्सुक नव्हती. आपण या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही, असे तिला वाटत होते. पण नंतर तिने ही भूमिका स्वीकारली. या नव्या बॉंडपटाचे दिग्दर्शन सॅम मेंडेस करणार आहे.


रिव्होल्युशनरी रोड व द अमेरिकन ब्युटी हे चित्रपट त्याने केले आहेत. यावेळचा जेम्स बॉंड अफगाणिस्तानात जाणार आहे. तेथे तो शत्रूशी लढणार आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "फ्रीडा झाली बॉंड गर्ल!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner