हेडली भारतात आरोपीचः न्यायालय
Posted on Tuesday, March 23, 2010 by maaybhumi desk
26/11 च्या मुंबई हल्लाच्या खटल्यामध्ये आरोपी असलेला डेव्हिड हेडलीला साक्षीदार करून घेण्या संदर्भातील
याचिका विशेष न्यायालयाने फेटाळून लावली असून या खटल्यात हेडली आरोपीच असून, भारतातही त्याला साक्षीदार नव्हे तर आरोपीच मानले जाईल, असा निर्वाळा विशेष न्या.एम.एल.टहलियानी यांनी दिला आहे.
मुंबईतील दहशतवादी हल्ला खटल्यातील सहआरोपी सबाउद्दीन अहमदने विशेष न्यायालयात हेडलीची साक्ष
घेण्यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. मात्र यास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याला आक्षेप घेतला.
मुंबई हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार म्हणून हेडली सध्या अमेरिकेच्या तुरुंगामध्ये आहे. त्यामुळे साक्षीदार म्हणून तो पुरावे देऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. हेडलीचे पाकमधील लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याने त्याला भारताकडे सोपविले तरीही त्याला आरोपीच ठरविले जावे असा युक्तीवादही त्यांनी केला.
याबाबत विशेष न्या.टहलियानी यांनी सबाउद्दीनची याचिका फेटाळली असून हेडली आरोपीच असल्याचा निर्वाळा दिला आहे.
देखिल वाचाः
संपूर्ण मुंबई किनापट्टीची रेकी केलीः हेडली
अमेरीकेत घराघरात दहशतवादी!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "हेडली भारतात आरोपीचः न्यायालय"
Post a Comment