पाकसोबत अणुकरार नाहीचः अमेरीका

Posted on Tuesday, March 23, 2010 by maaybhumi desk

इस्लामाबाद

अमेरीका पाकिस्तानसोबतही अणुऊर्जा करार करण्‍याच्‍या शक्यतेचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भारताने त्यावर जोरदार आक्षेप घेतल्‍याने अखेर पाकमधील अमेरिकन दुतावासाने दोन्‍ही देशांमध्‍ये असा कुठलाही करार होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या संदर्भात पाकमधील अमेरीकन दुतावासाने दिलेल्‍या माहितीनुसार अण्वस्र प्रसारासंदर्भात पाकिस्तानचा 'रेकॉर्ड' खराब आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍याशी असा कुठलाही करार होण्‍याची अजिबात शक्यता नसून याबाबत प्रसारित झालेले वृत्त निराधार आहे.

पाकने अण्वस्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याने, पाकिस्तानला नागरी अणुऊर्जा करारात समाविष्‍ट करून घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "पाकसोबत अणुकरार नाहीचः अमेरीका"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner