हल्ल्‍याच्‍या धमकीनंतर मुंबईत हायअलर्ट

Posted on Tuesday, March 23, 2010 by maaybhumi desk


मुंबई (mumbai)

मुंबईवर येत्या 36 तासांत मोठा दहशतवादी हल्‍ला करणार तसेच पुढील 24 तासात विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांना ठार करणार अशी धमकी देणारे दोन एसएमएस आ.खडसे यांच्‍या मोबाईलवर आल्‍याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सावध झाल्‍या असून तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.


या संदर्भात विरोधी पक्ष नेते खडसे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार नरेश नामक एका व्यक्तीने मोबाईल (mobile) क्र. 8983234298 वरून रविवारी सायंकाळी त्‍यांच्‍या मोबाईलवर 'येत्या 36 तासांत मुंबई शहर उडवून देणार
आहोत. अनामी रॉय, के. पी. रघुवंशी आणि माध्‍यमांनी हे शहर वाचवून दाखवावे' अशा आशयाचा SMS
पाठविला. खडसे यांनी या संदर्भात त्‍वरित गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र होऊ शकला नसल्‍याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, खडसे यांना सोमवारी पुन्‍हा याच क्रमांकावरून पुन्‍हा एक धमकीचा मॅसेज आला असून त्यात येत्या 24 तासांत त्‍यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली असल्‍याची माहिती पक्षाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


फडणीस यांनी हे प्रकरण विधानसभेत उपस्थित केल्यानंतर गृहमंत्री पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेत
चौकशीचे आदेश दिले आहेत. अशाच आशयाचा मॅसेज दोन दिवसांपूर्वी एटीएस प्रमुख रघुवंशी यांनाही आल्‍याचे
गृहमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

पोलिसांनी संबंधित क्रमांक कुठला आहे याबाबत माहिती गोळा केली असून आरोपीला त्वरित अटक करण्‍यात येईल असे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "हल्ल्‍याच्‍या धमकीनंतर मुंबईत हायअलर्ट"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner