सचिनच्या झंझावातात कोलकात्याची दाणादाण
Posted on Tuesday, March 23, 2010 by maaybhumi desk
मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कर्णधाराला साजेशा फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सचा सात गड्यांनी मोठा पराभव झाला असून सौरव गांगुलीच्या संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे.
येथील ब्रेब़ॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ख्रिस गेल आणि सचिन तेंडुलकरने धमाकेदार फलंदाजी केली. नाईट रायडर्सचा कर्णधार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. संघाच्या ख्रिस गेलने सावध सुरूवात करत मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच बदडले. त्याने 60 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 75 धावा केल्या. तर मुंबईच्या हरभजन सिंगने भेदक गोलंदाजी करत नाईट रायडर्सचा फज्जा उडविला.
कोलकाता संघाने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सचिन तेंडुलकरने धमाकेदार फलंदाजी करताना 48 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 71 धावा केल्या. तर जयसूर्याच्या गैरहजेरीत शिखर धवन, सौरभ तिवारी आणि आर. सतीशने सचिनला सुरेख साथ दिली.
त्यामुळे मुंबई इंडियन्सने 19व्या षटकातच आव्हान पार केले. नाईट रायडर्सचा हा सलग तिसरा पराभव आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "सचिनच्या झंझावातात कोलकात्याची दाणादाण"
Post a Comment