हेडलीच्‍या चौकशीचा निर्णय नाही: अमेरीका

Posted on Tuesday, March 23, 2010 by maaybhumi desk


शिकागो

पाकिस्‍तानी वंशाचा दहशतवादी डेव्‍हीड कोलमन हेडलीकडून कबुली जबाब वर्तवुन घेऊन त्याला मृत्युदंडाच्‍या शिक्षेपासून वाचविणा-या अमेरिकेने आता आणखी एक खेळी केली असून हेडलीच्‍या चौकशीची भारताला परवानगी द्यावी किंवा नाही याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतला गेला नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. हेडली हा अमेरिकेच्‍या सीआयएचाच एकेकाळचा एटंट असल्‍याच्‍या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्‍या होत्या ही बाब या पार्श्‍वभूमीवर लक्षात घेणे महत्‍वाचे आहे.


मुंबईतील दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या कटात हेडली प्रमुख सुत्रधार असून त्‍याच्‍या माहितीवरूनच लश्‍करने भारतावर हल्‍ल्‍याची योजना बनविली होती असा कबुली जबाब त्याने अमेरीकन न्‍यायालयासमोर दिला आहे. या संदर्भात हेडलीचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाणार नसले तरीही त्याच्‍या चौकशीची भारताला परवानगी दिली जाईल असे संकेत एमबीआय अधिका-यांनी दोन दिवसांपूर्वी दिले होते. मात्र अमेरीकेचे भारतातील राजदूत टिमोथी जे रोएमर यांनी आज पुन्‍हा याबाबत पलटी मारून हेडलीच्‍या चौकशी संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्‍याचे म्हटले आहे. 


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "हेडलीच्‍या चौकशीचा निर्णय नाही: अमेरीका"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner