किशोर कुलकर्णी यांना संगणक सारथी पुरस्‍कार

Posted on Wednesday, May 12, 2010 by maaybhumi desk

पुणे

सारथी या सामाजिक संस्थेतर्फे दिला जाणारा 'संगणक सारथी' हा पुरस्‍कार लोकमतच्‍या इंटरनेट आवृत्तीचे संपादक किशोर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या पुण्‍यातील व्‍यक्तींना हा पुरस्‍कार दिला जातो. यंदा पुरस्‍काराचे हे सातवे वर्ष आहे.

स्‍व.पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा हा पुरस्‍कार कुलकर्णी यांच्यासह साम टेक्नॉलॉजीज, सुरेश कट्टा, सिम्बॉयिसिस बाह्य अभ्‍यासक्रम विभागाच्‍या संचालिका स्वाती मुजुमदार, कॉम्प्युटर होमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत कुलकर्णी, भाऊसाहेब पाटील आणि टेक महिंद्राच्या अनुराधा देशपांडे यांनाही जाहीर झाला आहे.

संगणक तज्‍ज्ञ दीपक शिकारपूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आयटीच्‍या क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-यांची या पुरस्‍कारासाठी निवड केली आहे. येत्या 20 मे रोजी महात्मा फुले म्युझियम येथे परम संगणकाचे जनक पद्मश्री विजय भटकर, खा. सुरेश कलमाडी, पद्मश्री शां. ब. मुजुमदार आदींच्‍या उपस्थितीत या पुरस्‍काराचे वितरण केले जाणार आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner