भारतातील 20 ठिकाणं लश्‍करच्‍या हीटलिस्‍टवर

Posted on Monday, March 15, 2010 by maaybhumi desk

वॉशिंग्‍टन

पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर ए तैयबाच्‍या निशाण्‍यावर जगभरातील 320 ठिकाणे असून त्‍यापैकी 20 भारतीय ठिकाणे असल्‍याची माहिती 26/11 च्‍या हल्‍ल्‍याचा तपास करीत असलेल्‍या यंत्रणेने दिली असल्‍याची माहिती अमेरिकन सुत्रांनी दिली आहे.

अमेरिकन कॉंग्रेस गॅरी एकरमनने यांनी दिलेल्‍या माहितीनुसार लश्करने 320 ठिकाणांवर हल्‍ल्‍याची तयारी केली असून या संदर्भातील माहिती आणि इमेल तपास संस्‍थांच्‍या हाती लागले आहेत. त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार लश्कर अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्‍यावर सुरूवातीपासूनच हल्‍ले करीत असून अनेक वर्षांपासून त्‍यांनी भारतीयांवरही हल्‍ले केले आहेत.


एकरमन म्हणाले, की लश्कर सारख्‍या दहशतवादी संघटनांना संपविणे अतशिय गरजेचे असून त्‍याशिवाय अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्थिती सुधारण्‍याची वाट पाहता येणार नाही. तर लश्‍कर विरोधात त्‍वरित कारवाई करायला हवी. अन्‍यथा नंतर पश्‍चात्तापाची वेळ येईल.




वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

breaking news
current news



No Response to "भारतातील 20 ठिकाणं लश्‍करच्‍या हीटलिस्‍टवर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner