मदतीचे धान्‍य विकले 20 हजार डॉलरला

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

काबुल

अफगाणिस्तानातील एका व्‍यक्तीने संयुक्त राष्ट्र संघाकडून जागतिक अन्‍न कार्यक्रमांतर्गत देण्‍यात आलेले मदत साहित्‍य 20,000 डॉलरमध्‍ये विकल्‍याचे उघडकीस आले आहे.

या संदर्भात मिळालेल्‍या माहितीनुसार या अफगाणी नागरिकाने गव्‍हाचे 1,212 पोते, तेलाचे 224 बॉक्स, 145 बॉक्स साखर आणि 12 गोणी मीठ जबोल प्रांतातील कालत बाजारात विकले आहेत. सुरक्षा अधिका-याने या व्‍यक्तीस ताब्यात घेतले आहे. त्‍याच्‍याकडे या वस्‍तू मोफत वितरीत करण्‍यासाठी देण्‍यात आल्‍या होत्या.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मदतीचे धान्‍य विकले 20 हजार डॉलरला"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner