पुन्हा 26/11 झाल्यास युद्ध अटळ- अमेरिका
नवी दिल्ली
लष्कर ए तोयबासारख्या संघटनांनी अल कायदाशी हातमिळवणी करून मुंबईवर 26/11 सारखा आणखी एक हल्ला करण्याची तयारी चालवली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात सध्याच ताणले गेलेले संबंध पहाता, असे झाल्यास उभय देशांदरम्यान युद्धाला तोंड फुटू शकते, असा इशारा अमेरिकेचे संरक्षण मंत्री रॉबर्ट गेटस यांनी दिला आहे.
दक्षिण आशियात शांतता समतोल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कोणत्याही घटनेच्या ठिणगीने व्यर्थ ठरून त्याचा भडका उडू शकतो, असेही गेट्स यांनी नमूद केले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ही संपूर्ण परिस्थिती अतिशय संयमाने आणि मुत्सद्दीपणे हाताळली. पण यापुढे पुन्हा एकदा तसाच हल्ला झाल्यास भारत असाच वागेल काय हा मात्र प्रश्नच आहे, असे सांगून प्रत्येक हल्ल्यावेळी भारत संयमच पाळेल असे धरून चालणे काही योग्य ठरणार नाही, हेही गेट्स यांनी नमूद केले.
संरक्षणमंत्री ए. के. एंटोनी यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गेट्स बोलत होते.
No Response to "पुन्हा 26/11 झाल्यास युद्ध अटळ- अमेरिका"
Post a Comment