'आर्थिक विकासात भारताची महत्त्वाची भूमिका'

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

काहिरा
कच्च्या तेलाची मागणी स्थिरावण्याचे संकेत देत आगामी काळात आर्थिक विकासात चीन आणि भारताची महत्त्वाची भूमिका असेल असे मत पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना असलेल्या ओपेकने व्यक्त केले आहे.
 
मंदी ओसरल्यानंतर आता अनेक देशांमध्ये आर्थिक सुधारणा दिसून येत असून, 2010 वर्षात तेलाची मागणी आणि दर स्थिरावण्याची शक्यता ओपेकने व्यक्त केली आहे.

जागतिक आर्थिक विकास दर 3.1 टक्के राहण्याचा ओपेकचा अंदाज असून, यात भारत आणि चीन या दोन राष्ट्रांचा महत्त्वाचा वाटा असेल असे ओपेकचे म्हणणे आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'आर्थिक विकासात भारताची महत्त्वाची भूमिका'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner