आयपीएल लिलावाबाबत पीसीबी तक्रार करणार
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
लाहोर
इंडियन प्रीमियर लीगच्या तिसर्या सत्रात एकही पाकिस्तानी खेळाडूंसाठी फ्रॅंचाइजींनी बोलणी केली नाही, याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळकडे तक्रार करणार आहे. आयपीएलच्या लिलावात पाकचे 11 खेळाडू सहभागी झाले होते.
भारत आणि पाकिस्तानातील राजकीय तणावामुळे पाक खेळाडूंसाठी आठही फ्रॅंचाइजींनी बोलणी केली नाही. त्याबद्दल बोलताना पीसीबी अध्यक्ष एजाज बट म्हणाले की, आयपीएल लिलावाचा मुद्दा आम्ही बीसीसीआयकडे उपस्थित करणार आहे. आयपीएल अध्यक्ष ललीत मोदी यांनी पाक खेळाडूंची फसवणूक केली आहे. याबाबत आम्ही बीसीसीआयकडे तक्रार करणार आहे. पाक खेळाडूंना आयपीएल सहभागासाठी आवश्यक असणार्या सर्व गोष्टींची पुर्तताही आम्ही केली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "आयपीएल लिलावाबाबत पीसीबी तक्रार करणार"
Post a Comment