गंभीर ब्रॅडमनचा विक्रम मोडणार!
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
चटगाव![]()
भारताचा सलामवीर गौतम गंभीर याने कसोटीत सलग पाच शतके करुन सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांना मागे टाकले आहे. आता ऑस्ट्रेलियाचा महान फलंदा ज डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी त्याला पुढील कसोटीत शतक करावे लागणार आहे. ब्रॅडमन यांचा सलग सहा कसोटी शतकांचा विक्रम आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत गंभीरने 116 धावा करुन कसोटी कारकिर्दीतील नववे शतक केले. तसेच सलग पाचवे शतक होते. गंभीरकडून सातत्यपूर्ण कामगिरी होत असल्याने आयसीसी मानांकनात तो अव्वल स्थानी आहे. तसेच सन 2009 सालचा सर्वश्रेष्ठ कसोटी खेळाडू पुरस्कारही त्याने पटकविला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "गंभीर ब्रॅडमनचा विक्रम मोडणार!"
Post a Comment