सानिया लग्नानंतरही खेळणार

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

Sania1 हैदराबाद
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने लग्नानंतर टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा वृत्ताचा इन्कार केला आहे. लग्नानंतरही आपले टेनिसशी नाते कायम राहणार असून आपण खेळत राहणार असल्याचे तिने स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत सानिया म्हणाला की, मी लग्नाच्या दुसर्‍या दिवशी टेनिसची रॅकेट सोडून देईल, असे वृत्त भारतीय प्रसारमाध्यमे देत आहे. परंतु हे चुकीचे आहे. माझे वडील आणि पतीनेही माझ्या टेनिस कारकिर्दीस पाठिंबा दिला आहे. मला अजून खूप खेळायचे आहे आणि लग्नानंतरही मी खेळत राहणार आहे. निवृत्तीचा निर्णय मी योग्य ‍वेळी घेईल.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सानिया लग्नानंतरही खेळणार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner