तेलंगाणा समर्थक- पोलिसांत धुमश्चक्री

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

हैदराबाद
स्वतंत्र तेलंगाणा राज्याच्या मागणीसाठी येथील उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर तेलंगाणातील परिस्थिती चिघळली असून या विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच तेलंगाणा समर्थक नेत्यांनाही अटक केली आहे. तेलंगाणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदलाही हिंसक वळण लागले आहे.
 
उस्मानिया विद्यापीठातील वेणूगोपाळ रेड्डी या एमसीएच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याने स्वतंत्र तेलंगाणा राज्याच्या मागणीसाठी मंगळवारी स्वतःला पेटवून घेतले होते. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर तेलंगाणाच्या स्थापनेला उशिर होत असल्याबद्दल संतप्त झालेल्या समर्थकांनी हे आंदोलन यशस्वी करण्याचा चंग बांधला आहे.

आज या विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. वेणूगोपाळचा मृतदेह घेऊन तेलंगाणा समर्थक शहराकडे निघालेले असताना पोलिस व निमलष्करी दलाच्या जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यापीठाच्या आवारातच पोलिस व तेलंगाणा समर्थकांत जोरदार धुमश्चक्री झाली. तीत डझनाहून अधिक विद्यार्थी आणि पाच पोलिस जखमी झाले.

विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी लाठीमारही केला. नंतर पोलिसांनी वेणूगोपाळचा मृतदेह असलेली रूग्णावाहिका ताब्यात घेतली आणि तिला वेणूगोपाळच्या नालगोंडा या गावी पाठविण्यात आले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "तेलंगाणा समर्थक- पोलिसांत धुमश्चक्री"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner