यमनमधील अलकायदा दहशतवादी घोषित
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
वॉशिंग्टन
यमनमध्ये असलेल्या अल कायदा संघटनेस अमेरिकेने दहशतवादी संघटना जाहीर केले असून या संघटनेच्या नेत्यांविरोधात निर्बंध घातले आहेत.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील अल कायदाची अरब उपखंडातील यमनमध्येही शाखा असल्याचे आढळून आले असून या संघटनेच्या यमन मुख्यालयाने गेल्या 25 डिसेंबर रोजी एका नायजेरियन तरुणाच्या मदतीने अमेरिकन विमान उडवून देण्याचा प्रयत्न केला होता.
अरब उपखंडातील अल कायदाचे (एक्यूएपी) दोन प्रमुख नेते नासिर अल वाहिशी आणि सैद अल शिहरी यांनाही अमेरिकन परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांनी दहशतवादी घोषित केले आहे.
अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार अमेरिका एक्यूएपी आणि या संघटनेच्या इतर नेत्यांविरोधात आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेशी संपर्क करणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "यमनमधील अलकायदा दहशतवादी घोषित"
Post a Comment