भारतीयांवरील हल्ले वर्णद्वेशातूनचः कोसग्रोव्ह
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
कॅनबेरा
ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होणारे हल्ले वर्णद्वेशातून होत असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी सैन्य प्रमुख जनरल पीटर कोसग्रोव यांनी व्यक्त केले आहे.
जनरल कोसग्रोव यांनी या संदर्भात ऑस्ट्रेलियन अधिका-यांनी केलेले दावे साफ फेटाळले असून म्हटले आहे, की हे हल्ले शहरी गुन्हेगारीचा भाग नसून ते वर्णद्वेशाने प्रभावित आहेत. गेल्या 18 महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थी व भारतीय वंशाच्या लोकांवर तीवघेणे हल्ले सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणावही वाढला आहे.
जनरल कोसग्रोव म्हणाले, की हल्ले केवळ भारतीयांवरच होत नसून भारतीय उपखंडात राहणा-या भारतीय चेहरेपट्टी असलेल्या लोकांवरही ते होत असल्याने हल्ल्यामागे वर्णद्वेश हा एकच मुद्दा असल्याचे दिसते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "भारतीयांवरील हल्ले वर्णद्वेशातूनचः कोसग्रोव्ह"
Post a Comment