राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागारपदी मेनन

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

देशाच्‍या नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागारपदी (एनएसए) माजी परराष्‍ट्र सचिव शिवशंकर मेनन यांची निवड करण्‍यात आली असून ते एम.के. नारायणन यांच्‍याकडून पदभार स्‍वीकारणार आहेत. नारायणन यांची नुकतीच प.बंगालच्‍या राज्यपालपदी नियुक्ती झाल्‍याने ही जागा रिकामी होती.

मंत्रिमंडळाच्‍या नियुक्ती समितीने गुरुवारी त्‍यांच्‍या निवडीस मंजुरी दिली असून त्‍यांच्‍या निवडीचे औपचारिक आदेश शुक्रवारी निघण्‍याची शक्यता आहे. मेनन (60 वर्ष) यांचा दर्जा आता केंद्रीय राज्यमंत्र्याचा असणार आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागारपदी मेनन"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner