'एकाच वेळी दहशतवाद आणि भारत-पाक मैत्री अशक्य'
नवी दिल्ली
मुंबईवर 26/11 च्या हल्ल्याचा कट रचणा-यांवर पाकिस्तानने कारवाई करणे आवश्यक असून जोपर्यंत पाकिस्तानच्या भूमीवरील दहशतवादी तळ उध्वस्त होत नाहीत तो पर्यंत भारताची बेचैनी कायम राहणार असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री ए.के. एंटनी यांनी केले आहे.
एंटनी यांनी या संदर्भात सांगितले, की 26/11 च्या हल्ल्यात सहभागी लोकांविरोधात जोपर्यंत पाकिस्तान सरकार कारवाई करत नाही आणि आपल्या देशातून संचलीत होणारे दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी आवश्यक ते पावलं उचलत नाही तो पर्यंत दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव कमी केला जाऊ शकत नाही.
एंटनी म्हणाले, की सरकार आणि लोकांना कुठल्याची संघर्षात रूचि नाही. आम्ही मित्र बदलू शकतो पण दुर्दैवाने शेजारी बदलू शकत नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करीत नाही, तोपर्यंत दोन्ही देशात विश्वासाचे नाते तयार होणे तसे कठीणच आहे.
No Response to "'एकाच वेळी दहशतवाद आणि भारत-पाक मैत्री अशक्य'"
Post a Comment