अमेरीका तालिबानचे तळ उध्वस्त करणार
Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk
इस्लामाबाद
अफगाण-पाक सीमेवर असलेले तालिबानी दहशतवाद तळ पाकिस्तानला कुठल्याही स्थितीत उध्वस्त करावेच लागतील अन्यथा ते दोन्ही देशांसह जगभरासाठी घातक ठरू शकतात, असा इशारा अमेरिकन संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स यांनी दिला आहे.
सध्या पाकिस्तानच्या दौ-यावर असलेल्या गेट्स म्हणाले, की पाकिस्तानी तालिबानचे संचलन अफगाणिस्तानातील तालिबान आणि अलकायदा कडून केले जात असून या दोन्हीही संघटना घातक ठरत आहेत. त्यांच्यात फूट पाडणे आवश्यक आहे.
पाकिस्तानसोबत या संकटावर व्यापक युध्द धोरण ठरविण्याच्या दृष्टीने गेट्स यांचा दौरा महत्वाचा समजला जात आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "अमेरीका तालिबानचे तळ उध्वस्त करणार"
Post a Comment