रोमानिया अफगाणमध्ये सहाशे सैन्य पाठवणार
Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk
बुखारेस्ट
रोमानियाने अफगाणिस्तानात आणखी सहाशे सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतला असून लवकरच नवीन सैन्याची कुमक तेथे रवाना होणार आहे.
युरोपीय संघात सर्वांत गरीब देश असलेल्या आणि 2004 पासून उत्तर अटलांटिक संधी संघटनेचा (नाटो) सदस्य असलेला रोमानिया हा देश इराक आणि अफगाणिस्तानातील सैन्य अभियानात अमेरीकेचा सर्वांत घनिष्ट मित्र आहे.
अफगाणिस्तानात नाटो सैन्य अभियान आणि इतर अभियानात रोमानियाचे एक हजार 20 सैनिक सहभागी असून अतिरिक्त सहाशे सैनिकांना आणखी पाठवले जाणार असल्याने रोमानियन सैनिकांची संख्या 600 होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "रोमानिया अफगाणमध्ये सहाशे सैन्य पाठवणार"
Post a Comment