जन.कपूर यांना नेपाळचे मानद जनरल पद

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

काठमांडू

भारतीय स्‍थलसेना प्रमुख जनरल दीपक कपूर यांना गुरुवारी एका शानदार समारंभात नेपाळी सैन्‍याच्‍या मानद जनरल पदाने सन्‍मानित करण्‍यात आले.

राष्ट्राध्‍यक्ष रामबरन यादव यांनी आपल्‍या निवासस्‍थानी आयोजित भव्य कार्यक्रमात जनरल कपूर यांना स्मृती चिन्ह, तलवार आणि प्रशस्तिपत्र देऊन नेपाली सैन्‍य जनरल म्हणून विभूषित केले आहे. या वेळी नेपाळच्‍या संरक्षण मंत्री विद्या भंडारी, सेना प्रमुख जनरल छत्रमान सिंह गुरूंग आणि नेपाळमध्‍ये भारताचे राजदूत राकेश सूदही उपस्थित राहणार आहे.


जनरल कपूर यांच्‍यापूर्वी वर्ष 2003 मध्‍ये तत्कालीन भारतीय सैन्‍य प्रमुख जनरल एन.सी. विज यांनाही नेपाळी सैन्‍याच्‍या मानद जनरलपदाने सन्‍मानित करण्‍यात आले होते.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "जन.कपूर यांना नेपाळचे मानद जनरल पद"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner