रामू कंपनीचा दुसरा भाग बनविणार

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

रामगोपाल वर्मा आता कंपनी या आपल्याच गाजलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग बनविण्याच्या तयारीत आहे. रामूने सत्यामध्ये गुन्हेगारी टोळीयुद्ध हा विषय हाताळल्यानंतर संघटित गुन्हेगारीला आलेले कॉर्पोरेट रूप त्याने 'कंपनी'मध्ये दाखवले होते. आता कंपनीचा दुसरा भाग एनकाऊंटर स्पेशलिस्ट पोलिस अधिकार्‍यांवर बेतलेला असेल. यात दया नायक यांच्यासारखी व्यक्तिरेखाही असण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. लवकरच त्याचे शुटींगही सुरू होई, असे अंतर्गत सुत्रांकडून कळते.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "रामू कंपनीचा दुसरा भाग बनविणार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner