अमेरिकन ड्रोन हल्ल्यात पाच जण ठार
Posted on Tuesday, January 19, 2010 by maaybhumi desk
इस्लामाबाद
पाकिस्तानच्या अशांत वजीरिस्तान कबायली भागात अमेरिकन ड्रोन हल्ल्यात तालिबानचे पाच प्रमुख कमांडरसह अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतात एका भागात गेल्या तीस डिसेंबर रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यांमध्ये सीआयएचे सात अधिकारी मारले गेले होते. त्यानंतर अमेरिकेने वजीरिस्तानात ड्रोन हल्ले वाढविले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाक्तोई भागात रविवारी करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात तालिबान कमांडर शहाबुद्दीन, हफीज निजामुद्दीन, ख्वारे और मोहताजसह वीस दहशतवादी मारले गेले आहेत. पाकिस्तानातील तहरीक-ए-तालिबानचा पंजाब प्रांतातील मुख्य कमांडर अजमतुल्ला माविया हा देखिल या ड्रोन हल्ल्यात 15 जानेवारी रोजी मारला गेला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "अमेरिकन ड्रोन हल्ल्यात पाच जण ठार"
Post a Comment