मान्‍यताः गुरुकुल कांगडी विद्यापीठात तोडफोड

Posted on Tuesday, January 19, 2010 by maaybhumi desk

हरिद्वार
हरिद्वारच्‍या जगप्रसिध्‍द गुरुकुल कांगडी विद्यापीठाची मान्यता रद्द झाल्‍याच्‍या निषेधार्थ विद्यार्थ्‍यांनी येथे जोरदार तोड़फोड केली असून या घटनेनंतर पोलिसांनी 15 विद्यार्थ्‍यांना अटक केली आहे.

या विद्यापीठाची मान्‍यता रद्द झाल्‍याचे वृत्त प्रकाशित होताच चीडलेल्‍या विद्यार्थ्‍यांनी विद्यापीठाच्‍या आवारात जोरदार तोडफोड केली. यावेळी विद्यापीठातील वस्‍तूंसह विदयार्थ्‍यांनी विद्यापीठ परिसरात उभ्‍या असलेल्‍या गाड्यांचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. विद्यापीठाच्‍या तक्रारीनंतर पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे.

दरम्‍यान, विद्यापीठाच्‍या मान्यते संदर्भात कुठल्‍याही प्रश्‍नावर बोलण्‍यास विद्यापीठ प्रशासनाने नकार दिला आहे. विद्यापीठाच्‍या सचिवाने दिलेल्‍या माहितीनुसार आपल्‍या विद्यापीठाची मान्‍यता रद्द केल्‍या बद्दल आपल्‍याकडे कुठलेही पत्र नसून आम्हाला ही माहिती माध्‍यमांकडून कळली आहे. याबाबत युजीसीनेही कुठलेही आदेश दिलेले नाहीत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मान्‍यताः गुरुकुल कांगडी विद्यापीठात तोडफोड"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner