'हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' ऑस्करमधून बाहेर

Posted on Thursday, January 21, 2010 by maaybhumi desk

मुंबई
harishachandrachi factory चित्रपट क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणा-या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून पाठविण्यात आलेला "हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' हा मराठी चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट परकिय भाषेसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या मानांकन यादीत या चित्रपटाचे समावेश नाही. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या चरित्र्यावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट भारतात २९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' ऑस्करमधून बाहेर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner