नक्षलवादाच्‍या समस्येवर आज महत्‍वाची बैठक

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

रायपूर

नक्षलवादाच्‍या समस्‍येवर विचार करण्‍यासाठी शुक्रवारी रायपूर येथे एका महत्‍वाच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले असून गृहमंत्री पी. चिदंबरम या बैठकीच्या अध्यक्षास्‍थानी असतील. या बैठकीस नक्षल प्रभावित छत्तीसगढ आणि ओरीसाचेही मुख्‍यमंत्री उपस्थित असणार आहेत.

 

बैठकीस झारखंडचे मुख्य सचिव, डीजीपी आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटीलही उपस्थित असणार आहेत. ओरीसा आणि झारखंडमध्‍ये नक्षलवाद्यांविरोधात सरकारने सुरू केलेल्‍या कारवाईमुळे ओरीसा आणि झारखंडमधून पळून जाणा-या नक्षलवाद्यांचे मार्ग बंद करणे हा या बैठकीचा मुख्‍य विषय आहे.

 

मात्र या मुद्यावर केंद्र आणि झारखंडच्‍या शिबू सोरेन सरकारमध्‍ये मतभेद आहेत. केंद्राने झारखंडमध्‍ये नक्षलवाद्यांविरोधात सुरूच ठेवण्‍याचा पवित्रा घेतला आहेत. तर झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी त्‍यास नकार दिला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "नक्षलवादाच्‍या समस्येवर आज महत्‍वाची बैठक"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner