विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान नाहीः सिब्बल
नवी दिल्ली
देशातील स्वायत्त विद्यापीठाची संकल्पना समाप्त केली जाणार असली तरीही त्या अंतर्गत 44 विद्यापीठांची मान्यता रद्द केली जाणार असली तरीही या विद्यापीठातील कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, अशी घोषणा मनुष्य बळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी केली आहे.
यापूर्वी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात देशातील 44 डीम्ड विद्यापीठाची मान्यता रद्द करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
यासंदर्भात सामाजिक क्षेत्रातील मुद्यांवर आयोजित दहाव्या संपादक संमेलनात सिब्बल म्हणाले, की सर्व स्वायत्त विद्यापीठांची मान्यता काढून घेतली जाणार असून भविष्यात त्यासाठी एक निश्चित कायदा तयार केला जाणार आहे.
ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असून यात कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही.
सध्या देशात 100 स्वायत्त विद्यापीठे आहेत.
No Response to "विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान नाहीः सिब्बल"
Post a Comment