पवार आता दुधाच्या मागे!
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना नेमके काय झाले आहे, असा प्रश्न देशातील नागरिकांना पडला असून, डाळ, साखर पाठोपाठ आता देशात दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत दूध महागण्याचे भाकीत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी वर्तवले आहे.
काही महिन्यांपूर्वीच दिल्ली, मुंबई, पुणे यासह देशातील अनेक शहरातील दूध विक्रेत्यांनी दुधाच्या दरात एक ते दोन रुपये प्रती लीटरची वाढ केली आहे.
पवारांनी यापूर्वी डाळ आणि साखर महागण्याची भीती व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशात डाळ आणि साखरेचे भाव गगनाला भिडले होते. पवारांच्या या वक्तव्यावर पंतप्रधानांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता पवारांनी साखर स्वस्त होण्याचे भाकीत केले असून, या पाठोपाठ दूध महागण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "पवार आता दुधाच्या मागे!"
Post a Comment