शाहरूखने काढली आमीरची खोडी
बॉलीवूडचा बादशाह शा
हरूख खान आणि परफेक्शनिस्ट आमीर खान यांच्यातलं शीतयुद्ध काही नवं नाही. सार्वजनिक आयुष्यात दोघंही एकमेकांना ओरखडायची संधी सोडत नाहीत. आता शाहरूखने खोडी काढली आहे. आमीर खानचा परफेक्शनिस्ट स्वभाव सगळ्यांनाच माहित आहे. प्रत्येक गोष्टीत अचूकता असावी यासाठी त्याचा हट्ट नि आग्रह यामुळेच त्याला 'परफेक्शनिस्ट' हे विशेषणही मिळाले आहे. शाहरूखने ट्विटरवर लिहिलेल्या एका 'ट्विट'मध्ये आमीरच्यायापरफेक्शनिस्टपणावरच हल्ला चढवला आहे. 'परफेक्शन' ही अतिशय कंटाळवाणी बाब असल्याचे त्याने म्हटले आहे.
शाहरूखच्या शब्दांत, परफेक्शन म्हणजे कंटाळवाणा. वाईट खोड. उगाचच आपल्या इच्छित बाबीकडे पळत सुटणे. म्हणूनच परफेक्शनच्या मागे लागू नये असे सांगताना तो म्हणतो, एखादी गोष्ट साध्य करता येत असेल तर करा. पण त्याच्या अचूकतेच्या मागे लागू नका. जे काही करता त्याचा आनंद घ्यायला शिका.
शाहरूखने आमीरचे नाव घेतले नसले तरी त्याचा रोख कुणाकडे आहे ते परफेक्शन या शब्दातूनचकळून येते. शाहरूख खानचा माय नेम इज खान लवकरच रिलीज होतो आहे. आमीरचा थ्री इडियट सुपर डुपर हिट ठरल्याने शाहरूखला स्वतःच्या चित्रपटाची काळजी वाटू लागली आहे. हा चित्रपट हिट करण्यासाठी आता आमीरला बोचकारण्याचा उद्योग त्याने केला आहे.
No Response to "शाहरूखने काढली आमीरची खोडी"
Post a Comment